एसटी महामंडळाचे विलीनीकरण अशक्य, राज्य सरकारचा अहवाल विधानसभेत

483 0

मुंबई- एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करणं शक्य नाही, असं त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. कोर्टाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा हा अहवाल आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत पटलावर ठेवला. त्यात समितीने हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दर्जा मिळणार नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य काय असा प्रश्न विचारला जात आहे.

एसटी महामंडळाचं महाराष्ट्र सरकारमध्ये विलीनकरण व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे. समितीच्या अहवालातील निष्कर्षाबाबत सरकारकडून कोणतंही भाष्य करण्यात आलं नाही. या अहवालात तीन मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ते मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

मार्ग परिवहन कायदा 1950, इतर कायदा आणि नियम व अधिनियम तसेच प्रशासकीय बाबी विचारात घेता, महामंडळाचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवून कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलीनिकरण करणं ही मागणी मान्य करणं ही मागणी कायदेशीर तरतुदीनुसार शक्य नाही. सबब ही मागणी मान्य न करण्याची शिफारस आहे.

त्याचप्रमाणे महामंडळाचे शासनात विलीनिकरण करून सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून समजणे व महामंडळाच्या वाहतूकीचा व्यवसाय शासनाच्या विभागामार्फत करणे ही मागणी सुद्धा मान्य करणे कायद्याच्या तरतुदीनुसार तसेच प्रशासकीय आणि व्यवहारिक बाबी विचारात घेता शक्य नाही.
महामंडळाची सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता, त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेळेवल वेतन अदा करण्यासाठी किमान पुढील पाच वर्ष शासनाने त्यांच्या अर्थसंकल्पाद्वारे महामंडळास आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी समितीची शिफारस आहे. त्यानंतर योग्य वेळी महामंडळाच्या आर्थिक कामगिरीचा आढावा घेऊन पुढील आर्थिक मदतीबाबत निर्णय घेण्यात यावा.

या अहवालावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तीन सदस्यीय समितीच्या अहवालानंतर आता एसटी कर्मचारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Share This News

Related Post

कर्मचाऱ्यांना आता शनिवारी आणि रविवारी देखील करावे लागणार काम ! संपामुळे कामाचा लोड वाढला

Posted by - March 25, 2023 0
पुणे : कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी 14 मार्च 23 मार्च या कालावधीत संप पुकारला होता. त्यामुळे आर्थिक…
neelam-gorhe

Neelam Gorhe : ठाकरे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे शिवसेनेच्या वाटेवर?

Posted by - July 7, 2023 0
मुंबई : ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी शिवसेना ठाकरे गटातून…
CBI

हनीट्रॅप प्रकरणी मुक्त पत्रकारावर गुन्हा दाखल; CBI ची मोठी कारवाई

Posted by - May 16, 2023 0
पुणे : सीबीआयने (CBI) मुक्त पत्रकार विवेक रघुवंशी (Journalist Vivek Raghuvanshi) यांच्याविरुद्ध हेरगिरी केल्याप्रकरणी गुन्हा (Crime) दाखल केला आहे. सीबीआयकडून…

स्वतःचा जीव धोक्यात घालून चिमुकलीला वाचवणारा हिरो, पाहा थरारक व्हिडिओ

Posted by - May 14, 2022 0
नवी दिल्ली- अनेकवेळा लोक आपला जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवताना दिसतात. अशा घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना…
Buldhana News

Buldhana News : बुलढाणा हादरलं ! पोलीस पत्नी अन् मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या

Posted by - August 22, 2023 0
बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील चिखली येथे खामगाव रोडवर असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *