Breaking news ! 15 एप्रिल पर्यंत कामावर हजर व्हा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना हायकोर्टाच्या सूचना

130 0

मुंबई- एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी मागील 5 महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या एसटी संपाबाबत उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला दिला आहे. तुमची विलीनीकरणाची मागणी अमान्य झाली असून एसटी कर्मचाऱ्यांना 15 एप्रिल पर्यंत कामावर हजर होण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कोणालाही कामावरून काढू नये अशा स्पष्ट सूचना देखील न्यायालयाने दिल्या आहेत.

एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहे. राज्य सरकारने विलीनीकरणाची मागणी फेटाळून लावल्यामुळे उच्च न्यायालयाकडे शेवटी अपेक्षा होती. मात्र, न्यायालयाने स्पष्ट शब्दांत कामावर रूज होण्याचे आदेश दिले आहे. तर समितीच्चा शिफारशीनुसार विलीनीकरणास राज्य सरकारने नकार दिला आहे. महामंडळाकडून अवमान याचिका मागे घेण्याची तयारी दाखवली आहे.

आज झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने स्पष्ट शब्दात विलीनीकरणाची मागणी अमान्य झाल्याचे सांगितले. महामंडळाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे, पुढील चारवर्ष महामंडळ चालवलं जाईल त्यानंतर आर्थिक निकषांच्या आधारावर राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल, असं हायकोर्ट स्पष्टपणे सांगितलं.

हिंसा आणि कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांना रूजू करून घेऊ याबाबत ग्वाही देऊ शकत नाही, याबाबत लगेच निर्णय घेऊ शकत नाही, असे सरकारतर्फे न्यायालयात सांगण्यात आले. त्यावर कामगारांना एक संधी देणे गरजेचे, आहे असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. आंदोलन केलं तेव्हा परिस्थिती वेगळी होती. कामावरून काढून टाकून त्यांचे जगण्याचे साधन काढून घेऊ नका. याबाबत उच्च न्यायालयाने महामंडळाला निर्देश दिले आहेत.

ST महामंडळ सर्व कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रूजू करण्याबाबत भूमिका स्पष्ट करणार आहे. हिंसा किंवा गैरवर्तन केलेल्या कामगारांना परत सेवेत घ्यायचे की नाही याबाबत महामंडळाचे वकील उद्या गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात माहिती देणार आहे. याबाबत उद्याच्या महत्त्वपूर्ण सुनावणीमध्ये सरकार आणि एसटी कामगारांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे.

Share This News

Related Post

ISRO

इस्रोतर्फे नॅविगेशन सॅटेलाईटचे यशस्वी लाँचिंग; आता भारताला जगावर लक्ष ठेवता येणार

Posted by - May 29, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने (ISRO) सोमवारी (29 मे) रोजी जीपीएस प्रणालीच्या (GPS) सेवेमध्ये…

मुळशीत भूकंपाचे सौम्य धक्के ; 500 मीटर जमीन दुभंगली (पहा फोटो)

Posted by - July 19, 2022 0
पुणे : आज मुळशी धरण भागातील मौजे निंबाळवाडी आणि मौजे वडगाव वाघवाडी येथे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाच्या…
devendra-fadnavis

केंद्रीय अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - February 1, 2023 0
आज देशाचा अर्थसंकल्प सादर झालाय. यावर उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. ‘अमृतकालातील सर्वजनहिताय अर्थसंकल्प’, या संकल्पनेवर आधारित यंदाचा…

ब्रेकिंग न्यूज, मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा

Posted by - March 15, 2022 0
मुंबई- मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यावर माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

जरा हटके : वन्यजीव पाहायला आवडतात का ? जगातील या सर्वात धोकादायक प्राण्यांविषयी आश्चर्यकारक माहिती , नक्की वाचा

Posted by - March 8, 2023 0
वन्यजीव हे नेहमीच मानवांसाठी आकर्षणाचे साधन राहिले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की संपूर्ण जगात अशी मोजकीच ठिकाणे आहेत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *