एसटी विलिनीकरणासंदर्भातला अहवाल सरकारकडून कोर्टात सादर, सुनावणी 22 फेब्रुवारीला

438 0

मुंबई- एसटी विलिनीकरणासंदर्भातला उच्चस्तरीय समितीचा अहवाल कालच राज्य सरकारनं उच्च न्यायालयात सादर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आता या अहवालासंदर्भात 22 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यासह संपूर्ण एसटी कर्मचाऱ्यांचे या अहवालाकडे लक्ष लागले आहे.

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या शंभर दिवसांपासून संप पुकारला आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण आदी मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार एक उच्चस्तरीय समिती बनवण्यात आली आहे. त्यात राज्याच्या मुख्य सचिवांसह, अप्पर मुख्य सचिव आणि परिवहन विभागाच्या प्रधान सचिवाचा समावेश आहे. या समितीनं सर्व एसटी कामगार संघटना तसेच महामंडळाचे कर्मचारी यांचेही म्हणणे ऐकून घेतलं. त्यांनी मांडलेले मुद्दे, अभिप्राय नमूद असलेला अहवाल समितीनं मुख्यमंत्र्यांना सादर केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यावर आपला अभिप्राय दिला.

मात्र कालच संध्याकाळी बंद लिफाफ्यात मुख्यमंत्र्यांच्या अभिप्रायासह हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला सादर करण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. शुक्रवारच्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारतर्फे अहवाल सादर करण्यासाठी वेळ वाढवून मागितला गेला होता. कोर्टाने 18 फेब्रुवारीपर्यंत वेळ दिला होता. मात्र काल उशिरा अहवाल प्राप्त झाल्यानं राज्य सरकारतर्फे तो हायकोर्ट रजिस्ट्रारकडे सीलबंद लिफाफ्यात सादर करण्यात आला आहे. हायकोर्टात पुढील सुनावणी 22 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Share This News

Related Post

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी;आईच्या निधनाचा धक्का झाला नाही सहन; 15 दिवस स्वतःला ..

Posted by - November 22, 2022 0
पिंपरी : स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणतात ते सत्यच आहे. जगात अशी कोणतीच व्यक्ती नसेल जिला ही भावना…

दिग्दर्शक केदार शिंदे यांचं ‘झुंड’ विषयीचे ट्विट चर्चेत ; प्रेक्षकांना केलं झुंड पाहण्याचं आवाहन

Posted by - March 7, 2022 0
नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपट नुकताच 4 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाच्या निमित्तानं अमिताभ बच्चन यांनी कोरोना महामारी…

राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा आता ऑफलाईन, उदय सामंत यांची घोषणा

Posted by - May 28, 2022 0
मुंबई- राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा आता ऑफलाईन होणार आहेत. याबाबतची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली…
nagpur crime

Nagpur Crime : नागपूर हादरलं ! 6 ते 7 जणांकडून टपरीवर बसलेल्या दोन मित्रांवर प्राणघातक हल्ला

Posted by - August 17, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत राजीवनगर बसस्टॉपजवळ पान टपरीवर…

पुणे ते कात्रज रस्ता (जुना कात्रज घाट रस्ता) एकेरी वाहतूक करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश

Posted by - November 30, 2022 0
पुणे : पुणे कात्रज- शिंदेवाडी रस्ता राज्य मार्ग क्र. १२६ अर्थात जुना कात्रज घाट रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरु…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *