#PUNE : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद हजारो तरुणांचा सहभाग, ठिकठिकाणी जंगी स्वागत

616 0

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्राचारार्थ आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत रोड शो काढण्यात आला. या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो तरुण या रोड शोमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. तसेच ठिकठिकाणी या रोड शोचं स्वागत करण्यात आलं.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनता पक्षाने चांगली आघाडी घेतली असून, भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्राचारार्थ घरोघरी प्रचारासह सभा, पदयात्रा, बाईक रॅली अशा विविध मार्गांनी मतदारांशी संपर्क केला जात आहे. हेमंत रासने यांच्या प्राचारार्थ आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आले होते. गंज पेठेतील सावित्रीबाई फुले स्मारकासमोरुन रॅलीची सुरुवात झाली. अंगरशाह ताकिया, डांगे चौक, पालखी चौक, हमाल तालीम, नटरंग मंडप, पिंपरी चौक, नानापेठ, नाना चावडी, लक्ष्मीरोड, सोन्या मारुती, फडके हौद, लाल महाल, रतन टॉकीज, आप्पा बळवंत चौक, पत्र्या मारुती आदी मार्गांवरुन हा रोड शो मार्गस्थ झाला. रॅलीचा समारोप कामगार मैदानात झाला.

या रॅलीला तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो तरुण रॅलीत आपली दुचाकी घेऊन सहभागी झाले होते. तसेच ठिकठिकाणी फटाके वाजवून स्वागत करण्यात आलं, तर महिलांकडून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचं औक्षण करण्यात आलं.

Share This News

Related Post

2000 Notes

2000 Notes : दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत बदलण्यात येणार नोटा

Posted by - September 30, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दोन हजार रुपयांच्या नोटा (2000 Notes) बदलण्याची मुदत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून वाढण्यात आली आहे.…
rahul rekhawar

जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे; जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

Posted by - June 7, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) शहरातील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. संपूर्ण जिल्ह्यावर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. कोल्हापूरात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस…

Breaking News ठरले ! एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नाव ठरले ? हे असणार बंडखोर आमदारांच्या गटाचे नाव ?

Posted by - June 25, 2022 0
गुवाहाटी- एकनाथ शिंदे यांच्या बंदमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची टांगती तलवार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक…

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे पालिकेच्या पहिल्या रक्तपेढीचे लोकार्पण

Posted by - March 12, 2022 0
पुणे- महानगपालिकेमध्ये सत्ताधारी म्हणून काम करताना भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केवळ रस्ते, ड्रेनेज, कचरा यामध्ये अडकून न राहता मेट्रो, नदी…
BJP

BJP : भाजपकडून चार राज्यांचे नवे निवडणूक प्रभारी जाहीर ! ‘या’ मंत्र्यांवर देण्यात आली जबाबदारी

Posted by - July 8, 2023 0
मुंबई : सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने (BJP) आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयारी सुरू केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *