वीज प्रकल्पांना येणार गती ; वीज मनोरे व वाहिन्या उभारण्यासाठीच्या जमिनीसाठी मोबदल्याचे सुधारित धोरण

320 0

मुंबई : अति उच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित घोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

वीज मनोरा आणि वाहिनी उभारण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण केले जात नाही. केवळ जमिनीचा वापर केला जातो. मनोरा उभारताना जमिनीच्या आणि पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपोटी मोबदला दिला जातो. मात्र यासाठी सध्या असलेल्या शासनाच्या धोरणात सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. सध्याच्या धोरणात बाधित शेतकरी आणि जमीन मालकाना मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजी असल्याने त्यांचा तीव्र विरोध होत आहे.

त्यामुळे पारेषण कंपन्याचे विविध प्रकल्प रखडले आहेत. नव्या धोरणामुळे मनोरा आणि वाहिनी उभारणी वेगाने होऊन वीज निर्मितीस मदत होईल. या सुधारित धोरणाप्रमाणे ६६ के.व्ही. व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या अतिउच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठी खालील प्रमाणे मोबदला देण्यात येईल.

मनोऱ्याने व्याप्त जमिनीच्या क्षेत्रफळाचे रेडीरेकनर मधील किंवा मागील ३ वर्षातील झालेल्या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराच्या आधारे सरासरी दर यापैकी जो दर अधिक असेल त्या दराच्या दुप्पट मोबदला देण्यात येईल. मनोऱ्यातून जाणाऱ्या वाहिन्यांच्या पट्टयाखालील येणाऱ्या क्षेत्रासाठी अतिरिक्त १५ टक्के तसेच रेडीरेकनर किंवा सरासरी दर यापैकी जो दर अधिक असेल त्या दराच्या १५ टक्के असा एकूण ३० टक्के मोबदला दिला जाईल.

अपवादात्मक परिस्थितीत योग्य मोबदला ठरविण्याचे अधिकार उप विभागीय मुल्यांकन समितीस राहतील. पारेषण वाहिनीच्या विहित मार्गात कोणतेही बांधकाम करण्यास मान्‍यता राहणार नाही. पिके, फळझाडे किंवा इतर झाडांसाठीची नुकसान भरपाई संबंधित विभागाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे दिली जाईल. हे धोरण मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्राला लागू राहील.

मनोऱ्याने बाधित झालेल्या जमिनीचा मोबदला थेट संबंधित शेतकरी तसेच जमीन मालकाच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. हे धोरण संबंधित शासन निर्णय जाहीर झाल्यापासून काम सुरु असलेल्या व नवीन प्रस्तावित अशा सर्व अति उच्चदाब पारेषण वाहिनी प्रकल्पाना लागू राहील. मोबदला निश्चित करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुल्यांकन समिती असेल. या धोरणाच्या अंमलबजावणीत अडचण आल्यास धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेईल.

Share This News

Related Post

Molested

Molested : पुण्यात तरुणीची छेड काढल्याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल

Posted by - June 19, 2023 0
पुणे : पुण्यातील भोर तालुक्यातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एका तरुणाने तरुणीची छेड (Molested) काढत आपल्या काही साथीदारांच्या…
Robbery News

Robbery News : दर 2 वर्षांनी महाराष्ट्रातील ‘या’ बँक शाखेत पडतो दरोडा

Posted by - December 9, 2023 0
चंद्रपूर : आपण चित्रपटात अनेक वेळा बँक दरोडे, बँक चोरी आणि बँक फोडीचे प्रकार बघितले असतील. यामधील कथानक कशाप्रकारे बँकेवर…

Earthquake In Hingoli : हिंगोली जिल्ह्यात भूकंप; 3.6 रिश्टर स्केलची नोंद

Posted by - January 8, 2023 0
हिंगोली : काही दिवसांपासून देशांमध्ये अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. आज पहाटे साडेचारच्या सुमारास महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये…

मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार; अनिल बोंडेंच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

Posted by - June 20, 2022 0
विधापरिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत असून सर्वच राजकीय पक्षांनी या विधान परिषद निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विधान परिषदेच्या दहा…
Manoj Jarange

Manoj Jarange : नवी मुंबईत येताच मनोज जरांगेंची तब्येत बिघडली

Posted by - January 26, 2024 0
नवी मुंबई : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले आहेत. नवी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *