Gold Scheme

Sovereign Gold Bond Scheme: 11 सप्टेंबरपासून स्वस्त सोनं खरेदी करता येणार; जाणून घ्या किंमत, डिस्काउंट अन् बरंच काही

2866 0

आरबीआय लोकांना स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. हे सोनं तुम्ही बाजारभावापेक्षा कमी किमतींत खरेदी करू शकता. ग्राहकांना सॉव्हरिन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond Scheme) योजनेअंतर्गत स्वस्तात सोनं खरेदी करता येतं. RBI नं आर्थिक वर्ष 2023-24 साठी सॉव्हरिन गोल्ड बाँडची दुसरी सीरिज जारी केली आहे.

सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेंतर्गत स्वस्त सोनं खरेदीसाठी पाच दिवसांचा अवधी दिला जाणार आहे. सॉव्हरिन गोल्ड बाँड स्कीम 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत सबस्क्रिप्शनसाठी खुली असणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं ग्राहकांना सॉव्हरिन गोल्ड बाँड खरेदी करता येतं. सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये, गुंतवणूकदार 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्यात गुंतवणूक करतात म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करता येते.

सॉव्हरिन गोल्ड बाँड स्कीम इश्यू प्राईज
8 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेनं सॉव्हरिन गोल्ड बाँडच्या दुसऱ्या सीरिजसाठी इश्यू किंमत 5,923 रुपये प्रति ग्रॅम ठेवली आहे. तुम्ही प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन 99.9 टक्के शुद्ध सोनं खरेदी करू शकता. ऑनलाईन खरेदी केल्यास 50 रुपये प्रति ग्रॅमची सूट दिली जाईल. यामुळे किंमत कमी होऊन 5,873 रुपये प्रति ग्रॅम होईल.

सॉव्हरिन गोल्ड बाँड अंतर्गत सोनं कुठे खरेदी करता येणार?
जर तुम्हाला या योजनेत बाँड खरेदी करायचे असतील तर गुंतवणूकदार हे स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पोस्टऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, NSE आणि BSE च्या माध्यमातून खरेदी करु शकता. दरम्यान, लहान वित्त बँक आणि पेमेंट बँकेत याची विक्री होत नाही.

सॉव्हरिन गोल्ड बाँडचे फायदे
या योजनेत गुतवणूकदारांना वार्षिक 2.5 टक्के दरानं व्याज मिळतं.
या योजनेत कॅपिटल गेन टॅक्समध्ये सूट मिळते.
या योजनेंतर्गत सोने खरेदीसाठी जीएसटी आणि मेकिंग चार्ज द्यावा लागत नाही.
या व्यतिरिक्त, आपण हे कोलॅटरल म्हणून देखील वापरू शकतो.
आपण स्टॉक एक्सचेंजद्वारे ट्रेड करू शकता.
याव्यतिरिक्त या बाँड्सच्या सिक्योरिटीबाबतही गुंतवणूकदारांना टेन्शन घेण्याची गरज नाही.

सॉव्हरिन गोल्ड बाँड म्हणजे काय?
सॉव्हरिन गोल्ड बाँड हा एक सरकारी बाँड असतो. ही योजना आरबीआयच्या वतीनं जारी केली जाते. सरकानं ही योजना 2015 मध्ये सुरु केली होती. यामध्ये सोन्याच्या वजनाच्या रुपात खरेदी करु शकतो. जर हे बाँड 5 ग्रॅमचे असतील तर याची किंमत 5 ग्रॅम सोन्याच्या बरोबरीनं असते.

Share This News

Related Post

ST

धावत्या एसटीची चाकं निखळली; 35 प्रवाशांचा जीव टांगणीला (Video)

Posted by - May 16, 2023 0
पुणे : पुणे – नाशिक महामार्गावरील आंबेगाव तालुक्यात आज सकाळी एक धडकी भरवणारी घटना घडली. यामध्ये महामार्गावर धावणाऱ्या एसटी (ST)…
Washim Crime

आंबे तोडण्यासाठी शेतावर गेले असता बापलेकांचा वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 5, 2023 0
वाशिम : रविवारी वाशिम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली. यामध्ये रिसोड व मालेगाव…

लॉकडाऊननंतर पीएमपीचे दैनंदिन उत्पन्न पुन्हा दीड कोटींवर पोहोचले

Posted by - February 16, 2022 0
पुणे- कोरोना काळ व लॉकडाऊन नंतर प्रथमच ‘पीएमपी’चे उत्पन्न आणि प्रवासी संख्या पूर्वपदावर येत आहे. २०२० नंतर पहिल्यांदाच दैनंदिन प्रवासी…

‘ त्या ‘ वादग्रस्त पोलीस निरीक्षकाची अखेर उचलबांगडी ; महिलेच्या तक्रारीनंतर पुणे पोलीस आयुक्तांची कारवाई

Posted by - August 18, 2022 0
पुणे : गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे . राजेश पुराणिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *