#Solar Eclipse : 2023 वर्षातल्या पहिल्या सूर्यग्रहणाला ‘या’ ३ राशींनी सावध राहा; वाचा तारीख आणि ग्रहण कालावधी

5420 0

ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहण खूप महत्वाचे मानले जाते. भौगोलिक घडामोडींचाही सर्व राशींवर प्रभाव पडतो, असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण गुरुवार, 20 एप्रिल 2023 रोजी (सूर्यग्रहण दिनांक) होणार आहे. त्याचा कालावधी सकाळी ०७.०४ ते दुपारी १२.२९ असा असेल. ज्योतिष अभ्यासकांच्या मते, या ग्रहणाचा सर्व राशींवर प्रभाव पडेल. पण मेष राशीसह तीन राशीच्या व्यक्ती आहेत, ज्यांना या काळात खूप सावध राहण्याची गरज आहे.

कन्या
सूर्यग्रहणामुळे कन्या राशीच्या जातकांनी सावध राहण्याची गरज आहे. या काळात मनात नकारात्मक विचार येऊ शकतात, तसेच वाईट स्वप्नेही येऊ शकतात. मानसिक तणावाची चिन्हे आहेत. अपयशालाही सामोरे जावे लागू शकते. या काळात राग आणि बोलण्यावर संयम ठेवा, कारण त्यांच्यामुळे समस्या उद्भवू शकतात.

सिंह
एप्रिल महिन्यात सूर्यग्रहण असल्याने सिंह राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या काळात केलेल्या कामाचा विपरीत परिणाम होऊन शिक्षण क्षेत्रात अडथळे निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी सावध गिरी बाळगण्याची गरज आहे, कारण समस्या निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मानसिक दृष्ट्याही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

मेष
सूर्यग्रहणामुळे मेष राशीच्या लोकांना काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या काळात सूर्यदेव या राशीत विराजमान असतील, त्यामुळे ग्रहणाचा विपरीत परिणाम अधिक दिसेल. कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात आणि कोणतेही कार्य पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. सूर्यग्रहण काळात मेष राशीच्या व्यक्तींनी सावध गिरी बाळगणे आवश्यक आहे.

 

Share This News

Related Post

CRIME NEWS : जबरी चोरी आणि खून प्रकरणी आरोपीला बारा वर्षानंतर जन्मठेप; निगडी प्राधिकरणातील 2011 साली घडलेली घटना

Posted by - January 10, 2023 0
पिंपरी : 26 ऑगस्ट 2011 रोजी दुपारी बारा ते दोनच्या सुमारास एका घरामध्ये घुसून महिलेची कोयत्याने हत्या आणि त्यानंतर घरातील…

खुर्चीवर बसण्यावरून झाला वाद आणि संतापलेल्या तरुणाने थेट गोळीच झाडली

Posted by - March 30, 2023 0
एका फायनान्शियल कंपनीच्या ऑफिसमध्ये खुर्चीवर बसण्यावरून दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. त्यातून संतापलेल्या कर्मचाऱ्याने थेट बंदुकीतून गोळ्या झाडल्या. यामध्ये सहकारी कर्माचारी…

मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपला; शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे काळाच्या पडद्याआड

Posted by - August 14, 2022 0
मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात…

राज ठाकरेंचा पुणे दौरा; मनसेच्या गोटात तणाव; ‘त्या’ पत्रानंतर राज ठाकरे यांची कशी असणार भूमिका…

Posted by - December 27, 2022 0
पुणे : काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी एक सणसणीत पत्र लिहून आपल्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली होती. अर्थात नक्की…
Mumbai Pune Highway

Mumbai – Pune Express Way : मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक उद्या राहणार बंद

Posted by - August 31, 2023 0
पुणे : यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरुन (Mumbai – Pune Express Way) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *