देशातील ६२ शहरांमध्ये ‘सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क’; महाराष्ट्रात ‘या’ ६ शहरांमध्ये इन्फर्मशन टेकनॉलॉजि सेंटर उभारणार

222 0

दिल्ली : केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माहितीनुसार ‘आयटी’ उद्योगातून रोजगार निर्मितीच्या संधी अधिक असल्याने केंद्र शासनाने या क्षेत्रातील उद्योगांना चालना देण्यासाठी देशभरातील एकूण ६२ शहरांमध्ये ‘सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रामुख्याने ‘आयटी पार्क’साठी मोठय़ा शहरांची निवड केली जाते. मात्र, निवडलेल्या एकूण शहरांपैकी ५४ ही द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरे आहेत.                                                                                                                                                  माहिती तंत्रज्ञान उद्योगांना प्रोत्साहन व रोजगार निर्मितीसाठी देशभरात सुरू करण्यात आलेल्या एकूण ६२ ‘सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क  पैकी ५४ दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील म्हणजे तुलनेने लहान शहरांमध्ये आहेत. त्यात महाराष्ट्रातील सहा शहरांचा समावेश आहे.                      यात महाराष्ट्रातील नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या सहा शहरांचा समावेश आहे. याशिवाय नवीन २२ आयटी पार्कला मान्यता दिली आहे. ही सर्व लहान शहरे आहेत.                                                                                                                             केंद्र सरकारच्या या योजनेतून २४६ युनिट्सची स्थापना झाली असून त्यातून ५०,५१५ जणांना थेट रोजगार उपलब्ध झाला आहे. १२ ‘सॉफ्टवेअर पार्क’मध्ये उत्पादनासाठी केंद्र सरकारने ३ वर्षांत ९५ कोटी अर्थसाहाय्य केल्याची माहती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाली आहे.

राज्यनिहाय ‘सॉफ्टवेअर पार्क’

महाराष्ट्र – ६, कर्नाटक – ५, पश्चिम बंगाल – ५, उत्तर प्रदेश – ५, आंध्र प्रदेश – ४ तमिळनाडू – ४, तेलंगणा – ३, मध्य प्रदेश – ३ ओडिशा – ३, झारखंड – २, गुजरात – २, इतर राज्ये – प्रत्येकी एक एकूण – ६२

Share This News

Related Post

#Pune : तरुणाचे व्यायाम करून झाल्यानंतर फोनवर बोलत असताना दुर्दैवी निधन; मृत्यूचे कारणही आहे धक्कादायक ;नक्की जबाबदार कोण ?

Posted by - March 21, 2023 0
पुणे : ओपन जिममध्ये व्यायाम केल्यानंतर फोनवर बोलत असताना तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. अमोल शंकर नाकते (वय २१ वर्ष) या…

छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो…. संभाजीराजेंचं ट्विट

Posted by - May 29, 2022 0
कोल्हापूर- राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात सध्या चांगलीच हवा तापली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरुवातीला निवडणुकीत अपक्ष…

महाराष्ट्राचा ५६ वा वार्षिक निरंकारी संत समागम औरंगाबादमध्ये होणार संपन्न; पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातून हजारो भाविक राहणार उपस्थित

Posted by - January 23, 2023 0
पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या तारखा जसजशा जवळ येत चालल्या आहेत तसतसे निरंकारी भक्तगणांकडून समागमाच्या पूर्वतयारीला वेग…

….अखेर “त्या” व्हायरल पत्रावर एसटी महामंडळाचे स्पष्टीकरण

Posted by - March 8, 2022 0
एसटी संपातून माघार घेत पुन्हा कामावर रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे पत्र व्हायरल झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये…
pune

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप काळभोर यांची निवड

Posted by - May 9, 2023 0
पुणे : आज मंगळवारी सकाळी 11 वाजता सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी पुणे हवेली बाजार समितीच्या मार्केटयार्ड येथील कार्यालयात सर्व…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *