पुणे लोहमार्ग पोलिसांनी निवडला दुसरा ‘मार्ग’ आणि झाली निलंबनाची कारवाई

378 0

प्रवाशांना धमकावून लुबाडणारी टोळी तुम्ही ऐकली असेल. पण खाकी गणवेशात साहित्य तपासणीच्या नावाखाली प्रवाशांची लुबाडणूक करणाऱ्या सहा पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पुणे लोहमार्ग पोलिसांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

सहायक पोलिस उपनिरीक्षक बाळू पाटोळे (एलसीबी, पुणे लोहमार्ग), पोलिस हवालदार सुनील व्हटकर (एलसीबी, पुणे लोहमार्ग), पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यातील प्रशांत बजरंग डोईफोडे, जयंत गणपत रणदिवे, अमोल युवराज सोनवणे आणि विशाल दत्तात्रेय गोसावी अशी निलंबित केलेल्या सहा पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

पुणे रेल्वे स्थानकावर घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांकडे प्रवाशांचे साहित्य तपासण्याचे काम होते. त्यांनी तीन एप्रिल रोजी दुपारी एका तरुणासह त्याच्या मैत्रिणीला अडवून बॅगेत गांजा असल्याच्या संशयावरून त्यांची चौकशी केली. या दोघांना लोहमार्ग पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांसमोर हजर केले. त्याची नोंद स्टेशन डायरीत करून त्यांना सायंकाळी सोडून दिले.

दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी या दोघांकडून पाच लाख रुपये घेतल्याची माहिती मुंबईच्या लोहमार्ग पोलिस महासंचालक कार्यालयातून पुणे लोहमार्गचे प्रभारी पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांना देण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश राजेश बनसोडे यांनी पोलिस निरीक्षक इरफान शेख यांना दिले.

त्यानुसार रेल्वे फलाटावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता हे सहा कर्मचारी दोषी आढळले. बनसोडे यांनी या सहा कर्मचाऱ्यांवर बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्याचे आदेश दिले. या निलंबित कर्मचाऱ्यांकडे अनेक महिन्यांपासून प्रवाशांचे साहित्य तपासणीचे काम होते. त्यांना कोणाच्या सांगण्यावरून हे काम दिले गेले, हे मात्र अजून समजले नाही.

या सहाजणांपैकी एकावर प्रवाशांचे साहित्य तपासणीत गैरप्रकार केल्यामुळे जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. तरीही त्याची रेल्वे स्थानकात नियुक्ती केल्याचे समोर आले आहे.

Share This News

Related Post

Rape

Chhatrapati Sambhajinagar : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; DNA चाचणीमधून धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - July 22, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : आपल्याकडे बहीण- भावाचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. मात्र काही लोकांमुळे या नात्याला बदनाम केले जाते. याच…

#तू झूठी में मक्कार : रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचं नवं गाणं ‘शो मी द थुमका’ रिलीज VIDEO SONG

Posted by - February 21, 2023 0
मनोरंजन : रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या आगामी ‘तू झूठी मैं मक्कार‘ या चित्रपटातील ‘शो मी द ठुमका’ हे…
Thane News

Thane News : प्रवाशांच्या मदतीसाठी RPF जवान ट्रेनमध्ये चढला, मात्र उतरताना घात झाला अन्…

Posted by - August 14, 2023 0
ठाणे : कसारा रेल्वे स्थानकात एक धक्कादायक (Thane News) घटना घडली आहे. यामध्ये एका RPF जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.…
Thar

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं ! थेट ‘थार’ ला नांगर जोडून केली नांगरणी

Posted by - June 13, 2023 0
आजकाल शेतीदेखील आधुनिक पद्धतीने करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पुण्यातील इंदापूरात एका शेतकर्‍याने गजब फंडा आजमावत चक्क थार च्या साथीने…

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल

Posted by - November 23, 2022 0
पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *