बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचे पुण्यात निधन

382 0

पुणे- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लहान भगिनी श्रीमती संजीवनी करंदीकर (वय ८४) यांचे आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले.

संजीवनी करंदीकर यांचा जन्म पुण्यात झाला होता. त्यांच्या आयुष्यातील बरीच वर्षे पुण्यात गेली. त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. रिझर्व बॅंक ऑफ इंडियामध्ये ३८ वर्षे मशीन सेक्शन अधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते. त्यांच्या निधनाबद्दल शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या आत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, “संजीवनी करंदीकर या आमच्या आत्या होत्याच, पण प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या व शिवसेनाप्रमुखांच्या भगिनी होत्या. त्यांना एक समृद्ध वारसा लाभला व त्यांनी तो शेवटपर्यंत जपला. त्यांच्या जाण्याने शेवटचा दुवाही निखळला. संजूआत्या म्हणून त्या ठाकरे कुटुंबात प्रख्यात होत्या. प्रबोधनकारांप्रमाणेच त्या परखड होत्या. वाचनाचा छंदही अफाट होता”

“प्रबोधनकारांच्या अनेक गोष्टी त्या आम्हाला सांगत. सगळ्यात छोटी बहीण म्हणून शिवसेनाप्रमुखांचा संजूआत्यावर विशेष लोभ होता व संजूआत्याही आम्हा सगळ्यांना तेवढ्याच मायेने वागवत आल्या. त्यांच्या जाण्याने ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!”

Share This News

Related Post

#धक्कादायक : वेल्हे तालुक्यात भर दिवसा थरार; पप्पू शेठ रेणूसेची गोळ्या झाडून हत्या

Posted by - March 6, 2023 0
पुणे : जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. आज सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास अज्ञातांनी नवनाथ उर्फ पप्पू…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Posted by - July 9, 2022 0
नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित…

विद्यार्थी सहाय्यक समितीचे जेष्ठ कार्यकर्ते एन. डी. पाटील यांचे निधन

Posted by - November 21, 2022 0
पुणे : विद्यार्थी सहाय्यक समितीचे जेष्ठ कार्यकर्ते एन डी पाटील यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले त्यांच्या पश्चात दोन…

दुर्दैवी ! जनावरांसाठी कडबाकुट्टी करताना यंत्रात पदर अडकून महिलेचा मृत्यू

Posted by - May 16, 2022 0
नेवासा – जनावरांसाठी कडबाकुट्टी करताना दुर्लक्ष झाल्यामुळे एका महिलेचा पदर यंत्रात अडकला. यंत्रात फिरणाऱ्या बेल्टसहित महिला यंत्रामध्ये ओढली गेली. कडबाकुट्टी…

थंडगार ताकाचे फायदे : उन्हाळ्यात ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत, केवळ पचनातच नाही तर या समस्यांमध्येही प्रभावी

Posted by - February 22, 2023 0
HEALTH : उन्हाळ्याच्या ऋतूत लोक अनेकदा सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी ताक इत्यादींचे सेवन करतात. अनेक पोषक तत्वांनी युक्त…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *