PHOTO : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; दोन वर्षांच्या कोविड संकटानंतर ३१ हजार महिलांची उपस्थिती

296 0

पुणे : ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे ३१ हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले. ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते. कोविड संकटानंतर दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यंदाच्या गणेशोत्सवात हा सोहळा गणेशभक्तांनी अनुभविला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे ३१ हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल, परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यावेळी उपस्थित होते.

पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपामध्ये गर्दी केली होती. उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकापर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगेने भरून गेला होता. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा ३५ वे वर्ष होते. महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत महिलांनी गणरायाला अभिवादन केले. आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share This News

Related Post

मोठी बातमी ! पुण्यातील स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted by - April 20, 2022 0
पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो प्रकल्पास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.…

संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी, शिवसेनेकडून अधिकृत घोषणा ! कोण आहेत संजय पवार ?

Posted by - May 24, 2022 0
मुंबई- अखेर राज्यसभेसाठी शिवसेनेकडून सहावा उमेदवार म्हणून कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे…

अशोक पवार यांच्या एककल्ली कारभारामुळे ‘घोडगंगा’ अडचणीत ; शेतकऱ्यांच्या गळचेपी बाबत वार्षिक सर्वसाधारण सभेत जाब विचारणार

Posted by - September 27, 2022 0
पुणे : “रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोक पवार यांच्या एककल्ली कारभारामुळे चांगल्या स्थितीत असणारा साखर कारखाना आज…
Pune

अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक 25 मे ते 28 मेला पुण्यात होणार संपन्न

Posted by - May 16, 2023 0
पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पुणे येथे दि 25 मे ते 28 मे या दिवसात महर्षी…

केरळात थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी ऑनलाईन मागविलेल्या चिकन बिर्यानीने तरुणीचा घेतला जीव; कुटुंबियांवर उपचार सुरु

Posted by - January 7, 2023 0
केरळ : थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी ऑनलाईन मागविलेल्या चिकन बिर्यानीने केरळातील कासारागोड येथील थलकलयी गावातील एका तरूणीचा मृत्यू झाला आहे. या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *