धक्कादायक आकडेवारी : देशातील 131 शहर करत आहेत विष प्राशन; सर्वात जास्त प्रदूषित राज्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल

538 0

महाराष्ट्र : देशातील वाहनांची वाढती संख्या, लोकसंख्या, उद्योग व्यवसाय अशा अनेक कारणांमुळे देशातील प्रमुख शहरांचे वातावरण मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होते आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिलेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार देशातील 24 राज्यातील 131 शहरातील प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यापैकी 19 शहर अधिक धोकादायक पातळीच्या प्रदूषणाचा सामना करत असून नॅशनल क्लीन एअर प्रोग्राममध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहेत.

देशातील 131 शहर सर्वाधिक प्रदूषित असून धक्कादायक म्हणजे यातील सर्वात जास्त शहर ही महाराष्ट्रातील आहेत. प्रदूषित शहरापैकी बहुतांशी शहरांची लोकसंख्या 80 लाखाहून अधिक आहे. महाराष्ट्रात 19 सर्वात जास्त प्रदुषित शहरे आहेत, उत्तरप्रदेशात 17, आंध्रप्रदेशात 13 , पंजाबात 9 , मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि ओडीशातील प्रत्येकी सात शहरे सर्वाधिक प्रदूषित आहेत.

ही आहेत सर्वात प्रदूषित शहरे…

अकोला, अमरावती, संभाजीनगर ( औरंगाबाद ) , बदलापुर, चंद्रपुर, जळगांव, जालना, कोल्हापुर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापुर, ठाणे, वसई विरार आणि उल्हासनगर ही महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित शहरे बनली आहेत.

उत्तर प्रदेशातील आगरा, इलाहाबाद, अनपारा, बरेली, फिरोजाबाद, गजरौला, गाजियाबाद, गोरखपुर, झांसी, कानपुर, खुर्जा, लखनऊ, मोरादाबाद, नोएडा, रायबरेली, वाराणसी आणि मेरठ ही शहरे प्रदूषित आहेत.

आंध्र प्रदेशातील अनंतपुर, चित्तूर, एलुरू, गुंटूर, कडापा, कुरनूल, नेल्लोर, ओन्गोले, राजामुंद्री, श्रीकाकुलम, विजयवाड़ा, विशाखापट्टनम आणि विजयानगर पंजाबातील अमृतसर, डेरा बाबा नानक, डेरा बस्सी, गोबिंदगढ़, जालंधर, खन्ना, लुधियाना, नयानांगल आणि पटीयाला ओडिशा, मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेशातील प्रत्येकी सात शहरे प्रदुषित आहेत.

Share This News

Related Post

#VIRAL VIDEO : लग्नाच्या मंडपात नवरदेवाने केले असे कृत्य, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरता येणार नाही

Posted by - March 27, 2023 0
व्हायरल व्हिडिओ : सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. यासाठी सोशल मीडियावर दररोज लग्नाशी संबंधित व्हिडिओ शेअर केले जात आहेत. त्यातील…
Pune News Accident

Pune News Accident: आई – वडिलांचा आधार हरपला ! मित्रांसोबत बॅडमिंटन खेळून घरी जाताना काळाने केला घात

Posted by - August 7, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना (Pune News Accident) घडली आहे. यामध्ये मित्रांसोबत बॅडमिंटन खेळून रात्री दुचाकीवरून घरी…

Vice Presidential Election : 6 ऑगस्टला होणार उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक

Posted by - July 21, 2022 0
नवी दिल्ली : २१ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक पार पडते आहे. दरम्यान उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणूक प्रक्रिया ६ ऑगस्ट २०२२…

एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराला मंत्रीपद; मंत्रीपदासाठी फोन आलेले खासदार प्रतापराव जाधव नेमके कोण आहेत ? वाचा सविस्तर

Posted by - June 9, 2024 0
आज नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्या या शपथविधी वेळी काही मंत्रांचा शपथविधी देखील होणार आहेत.…

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांना साक्षीदारांनी ओळखलं

Posted by - March 20, 2022 0
सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या साक्षीदारांनी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान मारेकऱ्यांना ओळखले असून सचिन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *