धक्कादायक : अहमदनगरमध्ये वाळू तस्करी करणाऱ्या डंपरने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चिरडण्याचा केला प्रयत्न; फिल्मी थरार, सुदैवाने वेळेत ….

336 0

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळूची तस्करी करणाऱ्या डंपरने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. गुरूवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. वेळेत पोलीस अधिकारी व कर्मचारी बाजुला झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी डंपर चालक व इतरांवर जीवे मारण्याच्या कलमासह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, शेवगावचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तालुक्यातील लाडजळगाव परिसरात गस्त घालत होते. यावेळी रस्त्यावर उभे असलेले पोलिसांना खासगी वाहन वाळु तस्करी करणार्‍या डंपरने जोराची थडक देवून चिरडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडला आहे. या वाहनाजवळ उभ्या असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी वेळे बाजुला झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी डंपर चालक व इतरांवर जीवे मारण्याच्या कलमासह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

किशोर शहादेव पवार, बाळासाहेब उर्फ बाळू शहादेव पवार, हनुमान शहादेव पवार यासह इतर चौघे सर्व (रा. गुळज ता. गेवराई) अशी संशयितांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागूल, पो.काँ. बप्पासाहेब धाकतोडे, राहुल खेडकर, चालक होमगार्ड जमीर शेख यांचे पथक खाजगी वाहनाने (क्रमांक एम.एच. 16 सी.वाय – 7927) आज पहाटे 2 ते 5 च्या दरम्यान बीड सरहद्दीवरील सुकळी फाटा ते लाडजळगाव रस्त्यावर मुरमी गावच्या शिवारात तपासणी करत होते.यावेळी हा प्रकार घडला आहे.

यावेळी पहाटे 5 च्या सुमारास दहा टायर हायवा (क्रमांक एम.एच 23 ए.यु 1975) हे भरधाव वेगाने आले. त्यास थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने ते न थांबवता उभ्या असलेल्या कर्मचार्‍यांच्या अंगावर घालून जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. तर उभ्या असलेल्या पोलीसांच्या गाडीस मागील बाजूस धडक देवून भरधाव वेगाने निघुन गेला.

त्यानंतर त्या वाहनाचा पाठलाग करत असताना काळ्या रंगाच्या स्कार्पिओ वाहन चालकाने व दुचाकीवर आलेल्या व्यक्तींनी वेळोवेळी अडथळा निर्माण करुन हायवा चालक व वाहनास पळून जाण्यास मदत केली आहे.

सदरील वाहन किशोर पवार यांच्या मालकीचे असून ते अवैध वाळू तस्करीसाठी बाळू पवार, हनुमान पवार यांच्या मदतीने चालवून बोलेरो वाहन टेहळणी करण्यासाठी वापरत असल्याचे समजले. चकलांबा ता. गेवराई पोलीसांच्या मदतीने पाहणी केली असता गुळज येथे पवार यांच्या घऱासमोर वाळू वाहतुक करणारे वाहन आढळून आले. मात्र पोलीस आल्याचे कळल्याने सर्वजण पळून गेले. संशयितांवर जीवे मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमांसह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागूल हे पुढील तपास करीत आहेत.

Share This News

Related Post

Divya Pahuja

Divya Pahuja : मॉडेल दिव्या पाहुजाचा 11 दिवसांनंतर सापडला मृतदेह; ‘त्या’ एका पुराव्याने उलगडलं हत्येचं गूढ

Posted by - January 13, 2024 0
गुरुग्रमा : वृत्तसंस्था – मॉडेल दिव्या पाहुजा (Divya Pahuja) हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 10 दिवसांपासून दिव्या…

अभिनंदन..पण इतक्यावर थांबू नये ! खानाच्या कबरीवरील अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाबद्दल संभाजी छत्रपतींनी केले मुख्यमंत्र्यांचे कौतुक

Posted by - November 11, 2022 0
कोल्हापूर : शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार धडक कारवाई करून प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या खानाच्या कबरीवरील अतिक्रमण…

बसमध्ये झाली मैत्री; पुस्तक खरेदीच्या बाहण्याने पोहोचले पुण्यात; आरोपीने कोल्ड्रिंक मधून गुंगीचे औषध पाजून अत्याचार केला, तरुणीची 16 लाखाची फसवणूक

Posted by - March 1, 2023 0
पुणे : पुण्यात रोजच अत्याचार, बलात्कार फसवणुकीच्या घटना उघडकीस येत आहेत. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शहरात…
AMruta Fadanvis

Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांचे साप, घोरपड हातात घेऊन अनोखे फोटोशूट; सगळ्यांचं वेधलं लक्ष

Posted by - July 15, 2023 0
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या कधी आपल्या गाण्यामुळे तर कधी आपल्या वक्तव्यामुळे नेहमी…

Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी ‘त्या’ दोघांविरोधात सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Posted by - May 25, 2024 0
पुणे : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या वडिलांना अटक केल्यानंतर आता या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *