धक्कादायक : ब्रेक फेल झाल्यामुळे नाही तर ‘या’ कारणामुळे झाला नवले ब्रिजवरील अपघाताचा थरार ! वाचा सविस्तर

624 0

पुणे : रविवारी रात्री अपघातांचा पूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झाला. पण हा अपघात छोटा-मोठा नाही, तर तब्बल 48 वाहनांना एका टँकरने धडक दिली होती. या अपघातामध्ये सात ते आठ नागरिक जखमी झाले, तर वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सांगितले जात होते की, या टँकरचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला. परंतु आरटीओ अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या चालकाने पुलावर उतार असल्याकारणाने इंजिन बंद केलं होतं. आणि गेअर न्यूट्रल करत ट्रक चालवत होता. वेळेवर ब्रेक दाबून न शकल्यामुळे त्यानं तब्बल 48 गाड्यांना जबर धडक दिली आहे.

TOP NEWS MARATHI LIVE : पुण्यातील नवले पूलावर भीषण अपघात, कंटेनरनं 30हून अधिक गाड्यांना दिली धडक; पाहा…थेट घटनास्थळावरून LIVE

हा अपघात झाल्यानंतर या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला मनीराम छोटेलाल यादव असे या चालकाचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

मला पक्षादेश पाळायचाय; आजारी असतानाही लक्ष्मण जगताप मुंबईत जाऊन करणार राज्यसभेसाठी मतदान

Posted by - June 9, 2022 0
राज्यसभा निवडणुकीसाठी  मतदान आता काही तासांवर येऊन ठेपले आहे. एका एका आमदाराचे मतदान प्रत्येक पक्षाला अत्यंत गरजेचं झालं आहे. त्यासाठी…
Pune News

Pune News : अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण

Posted by - May 10, 2024 0
पुणे : आज अक्षय तृतीया, साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला आजचा दिवस खूप शुभ आणि मंगल समजला जातो. अक्षयतृतीयेच्या या मंगलदिनी…

विधिमंडळात एकमतानं मंजूर झालेलं लोकयुक्त विधेयक नेमकं आहे तरी काय

Posted by - December 30, 2022 0
  केंद्र सरकारनं लोकपाल कायदा केल्यानंतर राज्यांनी देखील अशाच पद्धतीचा कायदा करण्याची अपेक्षा होती त्यानुसार लोकायुक्त कायदा करणारे महाराष्ट्र हे…

TOP NEWS SPECIAL : अष्टविनायक दर्शन , महत्व , इतिहास , दर्शनासाठी हे आहेत मार्ग

Posted by - August 30, 2022 0
अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची श्रीगणेश मंदिर आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे.…

सिंधुदुर्गात झालेले खून कुणी केले हे महाराष्ट्राला माहीत आहे, विनायक राऊत यांचे राणे यांना प्रत्युत्तर

Posted by - February 19, 2022 0
मुंबई- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर प्रचंड गंभीर आरोप केले. त्यांच्या या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *