धक्कादायक : खराडीत खडक फोडण्यासाठी लावलेल्या सुरुंगाचा स्फोट ; एका मजुराचा मृत्यू, एक जखमी

8444 0

पुणे : बांधकाम प्रकल्पात खोदकाम केल्यानंतर सापडलेला खडक फोडण्यासाठी लावण्यात आलेल्या सुरुंगाचा स्फोट होऊन त्यातून मोठ्या प्रमाणावर उडालेले दगड लागून एका बांधकाम मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक बांधकाम मजूर जखमी झाला असल्याची घटना घडली आहे.

खराडी भागात प्लॅनेज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कडून बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू असताना खड्ड्यात सुरुंग लावण्यात आला होता. यावेळी सुरुंगाचा स्फोट झाला. त्यानंतर दगड उडाले आणि यातील एक बांधकामजूर शेख याच्या डोक्याला दगड लागल्याने उपचारा पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तर मनू चौधरी नावाच्या बांधकाम मजुराला हातावर दगड लागला आहे.

याप्रकरणी ठेकेदाराच्या बेजबाबदारपणात तसेच बांधकाम मजुरांना सुरक्षा विषयक साहित्य न पुरवल्याने दुर्घटना घडली असल्याकारणाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; जाणून घ्या निवडणूक प्रक्रिया

Posted by - August 6, 2022 0
नवी दिल्ली: भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला पूर्ण होत असून आज उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुक प्रक्रिया पार…
sharad pawar

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीला मोठा दिलासा; कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका घडयाळ चिन्हावर लढण्यास परवानगी

Posted by - April 15, 2023 0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला असून कर्नाटकात घड्याळ…

#CRIME : प्रियकराच्या पत्नीसोबत संबंध ठेवण्यासाठी प्रेयसीने संपवले प्रियकराचे आयुष्य; चौकशीतुन जे समोर आले त्याने पोलीसही चक्रावले

Posted by - February 27, 2023 0
पटना : पटना मधील दानापूर मधून एक विक्षिप्त घटना उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वी पवन राम या व्यक्तीची हत्या करण्यात…

भोई प्रतिष्ठानच्या वतीने समाजाच्या वंचित घटकातील मुलांसाठी “रंगबरसे” रंग महोत्सवाचे आयोजन

Posted by - March 7, 2023 0
भोई प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी समाजाच्या वंचित घटकातील मुलांसाठी धुलीवंदनच्या दिवशी “रंगबरसे” हा रंग महोत्सव आयोजित करण्यात येतो. यामध्ये अनाथ एचआयव्ही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *