विटंबना झालेल्या महाराजांच्या बंगळुरूमधील पुतळ्याला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा दुग्धाअभिषेक

339 0

बंगळुरू- काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. या घटनेचे महाराष्ट्रासह देशभरात पडसाद उमटले होते. त्याच बंगळुरूमध्ये आज शिवजयंतीचे औचित्य साधत खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादीचे युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या हस्ते या पुतळ्याला दुग्धाअभिषेक करण्यात आला.

प्रफुल्ल तावरे, डॉ. घनःश्याम राव याच्यासह महाराष्ट्रातील असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते. त्याचबरोबर बंगळुरू मधील शिवप्रेमींनीही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

या पुतळ्यासमोर स्वतः पहाडी आवाजात गारद शिवगर्जना देऊन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवजन्मोत्सव दिनी शिवरायांना मानवंदना दिली. खासदार डॉ. कोल्हे यांनी मानवंदना देण्यापूर्वी कर्नाटक सरकारच्या वतीने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. त्यामुळे डॉ. कोल्हे यांना मानवंदना देण्यासाठी विलंब झाला. मात्र यंदा प्रथमच कर्नाटक सरकारच्या वतीने शिवरायांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम झाल्याचे स्थानिक शिवप्रेमींनी निदर्शनास आणून त्याबद्दल आनंद व्यक्त केला.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेची विटंबना होणे ही क्लेशदायक बाब आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हा प्रकार समर्थनीय नाही. त्यामुळेच या ठिकाणी येऊन जाहीरपणे गारद (शिवगर्जना) करुन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याचे ठरवले होते. त्यानुसार अतिशय चांगल्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. तसेच या स्थानिक पोलीस प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल खासदार डॉ. कोल्हे यांनी त्यांना मनापासून धन्यवाद दिले.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात कर्नाटकातील रणधीर सेनेच्या गुंडांनी बंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. या घटनेचे महाराष्ट्रासह देशभरात पडसाद उमटले होते. त्यामुळे यंदाच्या शिवजयंतीला शिवनेरी गडावर जाण्याऐवजी बंगळुरू येथे जाऊन छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्यासमोर ऐतिहासिक गारद (शिवगर्जना) देऊन शिवरायांना अभिवादन करण्याचा निर्णय डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतला. त्यानुसार खासदार डॉ. कोल्हे आपल्या निवडक सहकाऱ्यांसह काल रात्री उशिरा बंगळुरू येथे दाखल झाले होते.

Share This News

Related Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीनं कारवाई केलेलं प्रकरण नेमकं आहे तरी काय ?

Posted by - March 23, 2022 0
रश्मी ठाकरेंचे भाऊ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाईत…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्रैमासिक ‘शिक्षकमित्र’ या विशेषांकाचं प्रकाशन

Posted by - February 27, 2022 0
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्रैमासिक ‘शिक्षकमित्र’ या विशेषांकाचं राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्रैमासिक…

चैत्र नवरात्री : चैत्र नवरात्रीत वास्तूदोष, नोकरी-व्यवसाय वृद्धीसाठी देवी भगवतीची अशी करा पूजा; मिळतात चमत्कारिक फायदे

Posted by - March 21, 2023 0
चैत्र नवरात्र 2023 वास्तु उपाय : दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेने चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, यावर्षी चैत्र…
Vasant More

Vasant More : ‘….अपमान किती सहन करायचा’, ‘मनसे’चा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - March 12, 2024 0
पुणे : मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी पक्षाला…

राजेश पाटलांची उचलबांगडी ! शेखर सिंह हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त ( VIDEO )

Posted by - August 16, 2022 0
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली असून आता त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *