शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार – दीपक केसरकर

181 0

पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांची व्यापक बैठक बोलावली जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत सांगितले. तसेच शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पूर्तता प्राधान्याने केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

मंत्री केसरकर यांनी सांगितले की, शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची २३.३ किलोमीटर लांबी आहे. संकल्पना करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वानुसार हा प्रकल्प बांधण्यात येत आहे. या कामास सुरुवात झाली असून प्रकल्प कालावधी ४० महिने आहे. या प्रकल्पातील एकात्मिक उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी एकेरी मार्ग करणे, नो पार्किंग, नो हॉल्टिंग झोन करणे, सायकल ट्रॅक आणि फुटपाथ काढून रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहेत.

पुणे मुंबई महामार्गावरील चांदणी चौकातील पुलाचे कामही लवकरच पूर्ण केले जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी सदस्य भीमराव तापकीर यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले. याबाबत आमदार सिध्दार्थ शिरोळे, राहुल कुल, भीमराव तापकीर यांनी चर्चेत सहभाग घेतला.

Share This News

Related Post

Pimpri Chinchwad

Pimpri Chinchwad : खळबळजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये इंजिनिअर तरुणीची गोळ्या झाडून हत्या

Posted by - January 28, 2024 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधून (Pimpri Chinchwad) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका ओयो हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्याने…

दिलासादायक! पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीत आता वाहन शुल्क माफ

Posted by - April 14, 2023 0
पुणे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत एन्ट्री करण्यासाठी वाहन टॅक्सची वसुली आता बंद करण्यात आली आहे. दि १३ एप्रिल (मंगळवार) रोजी रात्री १२…

” मेट्रो ३ प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास पूरक ठरेल “…! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - August 30, 2022 0
मुंबई : राज्य शासन पायाभूत सुविधांना प्राधान्य देत आहे. त्याअंतर्गत मुंबईकरांसाठी नव्याने लाईफ लाईन ठरणारा मेट्रो ३ प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची…
SSC-HSC Exam

SSC-HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल, आता ‘हे’ काम होणार ऑनलाईन

Posted by - January 17, 2024 0
मुंबई : दहावी बारावीच्या परीक्षेला (SSC-HSC Exam) पुढील महिन्यापासून सुरुवात होणार आहे. या दरम्यान आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक…

धक्कादायक : कोयता गॅंग मधील 7 अल्पवयीन मुलांची बाल निरीक्षण गृहात केली होती रवानगी; भिंतीला शिडी लावून असे झाले फरार

Posted by - January 31, 2023 0
पुणे : शहरातील कोयता गॅंग मधील सात अल्पवयीन मुलांची रवानगी येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राच्या बालनिरीक्षणगृहामध्ये करण्यात आली होती.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *