‘शिवाई’ या पहिल्या विद्युतप्रणालीवरील बसचे लोकार्पण व विद्युत प्रभारक केंद्राचे उद्घाटन (व्हिडिओ)

466 0

पुणे- राज्य परिवहन महामंडळाने आपल्या बससेवेत काळानुरूप बदल केले असून महामंडळाच्या बसच्या माध्यमातून सुरक्षित अणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

स्वारगेट बसस्थानक येथे आयोजित महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे विभागाच्या ‘शिवाई’ या विद्युत बससेवेचा शुभारंभ आणि विद्युत प्रभारक केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, गुणवत्ता वाढीसाठी नवीन बदल करून प्रवाशांना सुरक्षित प्रवास निश्चित करणे हेच एसटीचे ध्येय आहे. याच उद्दीष्टावर आधारीत प्रदूषण विरहीत, आवाज विरहीत ‘शिवाई’ बस आहे.

नागरिकांनी निश्चितपणे या बससेवेचा लाभ घ्यावा. समाजातील सर्व घटकांना एसटीची सेवा आपली वाटली पाहीजे यासाठी सर्व सोईसुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नजिकच्या काळात प्रत्येक आगारात विद्युत प्रभारक केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. राज्य सरकार त्यासाठी आवश्यक सहकार्य करीत आहे.

एसटीवरचा जनतेचा विश्वास संपादन करणे महत्वाचे आहे. प्रवाशांना सुरक्षितरित्या प्रवास करता यावा यासाठी व्यवस्था वाढविण्यात येत आहेत. प्रवाशांच्या गरजा ओळखून एसटीने काळानुरूप अनेक बदल केले. निमआराम, वातानुकुलीत बस, अश्वमेध, शिवनेरी अशा बससेवा सुरू करण्यात आल्या. २०१७ मध्ये शिवशाही बस महामंडळाच्या सेवेत समाविष्ट करण्यात आली आणि आता विद्युत घटावर चालणारी बससेवा सुरू होत असून हा महत्वपूर्ण प्रसंग असल्याचा उल्लेखही पवार यांनी केला.

विद्युत प्रणालीवर चालणाऱ्या शिवाई बसची वैशिष्ठ्ये

शिवाई बस विद्युत घटावर चालणारी आहे. त्यामुळे बस प्रदूषण विरहित, पर्यावरण पूरक, वातानुकुलीत व आवाज विरहित आहे. बसला आकर्षक रंगसंगतीमध्ये ‘शिवाई’ असे नाव देण्यात आले आहे. बस एकदा चार्ज केल्यानंतर जास्तीत जास्त २५० कि.मी. पर्यंत जाऊ शकते. प्रत्येक प्रवाशांसाठी स्वतंत्र व स्वनियंत्रित वातानुकुलीत लुव्हर बसविण्यात आले आहे व त्या सोबत वाचण्यासाठी स्वतंत्र दिवा देण्यात आला आहे. ही बस १२ मीटर लांबीच्या सांगाड्यावर बांधण्यात आली असून तिची रुंदी २.६ मीटर व उंची ३.६ मीटर आहे. सांगाड्याच्या खालच्या बाजूस बसच्या मधोमध प्रशस्त असा सामान कक्ष देण्यात आला आहे.

शिवाई बसमध्ये ४३ प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था असून प्रवासी सीट हे ‘पुश बॅक’ प्रकारचे देण्यात आले आहे. प्रत्येक दोन सीटच्यामध्ये दोन्ही प्रवाशांचे मोबाईल चार्जिंगसाठी स्वतंत्र युएसबी पोर्ट देण्यात आले आहे. चालक केबिन मध्ये प्रवाशी घोषणा यंत्रणा बसविली आहे. तसेच आपात्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना सावध करण्यासाठी यंत्रणा असून त्याचे बटन चालक कक्षात देण्यात आले आहे. प्रवासी कक्षातील हालचालीवर देखरेखीसाठी कॅमेरा प्रवाशी कक्षात बसविण्यात आले आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी अँड्रॉईड टीव्ही बसविण्यात आला आहे.

Share This News

Related Post

अजब लग्नाची गजब कहाणी ! 24 वर्षाची तरुणी करणार आत्मविवाह !

Posted by - June 2, 2022 0
वधू वराचे लग्न होते ही तर सामान्य गोष्ट आहे. यापूर्वी दोन मुलींनी एकमेकांशी लग्न केल्याची बातमी देखील तुम्ही वाचली असेल.…

धक्कादायक ! पुणे जिल्ह्यातील यवत येथून १० वर्षीय मुलीचे अपहरण

Posted by - April 17, 2023 0
पुणे जिल्ह्यातील यवत गावातून एका १० वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली आहे. घराबाहेर खेळायला जाते असे सांगून…
Sharad Pawar Speak

Sharad Pawar On Communal riots : राज्यात धार्मिक दंगली घडत नाहीत, घडवल्या जातात; पवारांचा नेमका कोणावर निशाणा?

Posted by - June 7, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी…
Satara Accident

Satara Accident : पुणे बंगळुर हायवेवर भीषण अपघात; सख्ख्या भाऊ-बहिणीसह भाच्याचा मृत्यू

Posted by - October 14, 2023 0
सातारा : सातारा (Satara Accident) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये पुणे-बेंगलोर महामार्गावर पाचवड फाटा तालुका कराड या…
Sharad Pawar

Assembly Election 2023 : तेलंगणा मिळवलं पण इतर राज्यात काँग्रेसला बसला फटका; शरद पवारांनी सांगितलं पराभवामागचे कारण

Posted by - December 3, 2023 0
सातारा : आज 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.सध्याच्या निकालानुसार (Assembly Election 2023) भाजपने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *