शिवसेना शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या कायम पाठीशी; शिवसेना युवानेते आ. आदित्य ठाकरे

190 0

जुन्नर : वडगाव आनंद येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी दशरथ केदारी यांच्या घरी आज शिवसेनेचे युवानेते आणि महाराष्ट्राचे मा. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. या कुटुंबीयांची आस्थेने चौकशी करीत त्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे असल्याचे सांगितले. या कुटुंबियांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे ते म्हणाले.

यावेळी सदर कुटुंबीयांशी बोलताना मा. आदित्यजी ठाकरे यांनी, ‘सदर कुटुंबीयांना भविष्यात शिवसेनेच्या वतीने संपूर्ण मदत केली जाईल. . आणखी काही स्वरूपाची मदत लागल्यास अवश्य केली जाणार आहे’, असे सांगितले.
यावेळी भाऊबीजेच्या निमित्ताने या कुटुंबियांच्या वतीने आदित्यजीना ओवाळण्यात आले.

त्यांच्या समवेत विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शेतकरी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पुणे संपर्कप्रमुख आ. सचिन अहिर होते.

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचेकडे शेतकरी महिलांची मत व्यक्त केले की, शेतीमालाला हमीभाव मिळणे आवश्यक आहे. या कुटुंबीयांचे राज्य शासनाकडे पाठविलेले घरकुल, संजय गांधी निराधार योजना आणि इतर प्रस्तावांची माहिती देण्यासाठी यावेळी डॅा. नीलम गोर्हे यांना उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या प्रस्तावांचा पाठपुरावा डॉ. गोऱ्हे येत्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात करणार आहेत.

या कुटुंबीयांनी डॉ. गोऱ्हे यांनी सदर घटनेनंतर तात्काळ केलेल्या मदतीचा यावेळी आवर्जून उल्लेख केला.

स्थानिक शिवसेना पदाधिकारी सुरेश भोर, प्रसन्ना डोके, माऊली खंडागळे, ज्योत्स्ना महांबरे, युवती सेना अधिकारी नीलम गावडे आणि शिवसेना कार्यकर्ते, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This News

Related Post

इच्छुकांनो तयारीला लागा! महापालिकांसाठी 29 जुलैला आरक्षण सोडत

Posted by - July 23, 2022 0
ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळं रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालाय. यासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर…

पुण्यातील भिडे वाड्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणार; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Posted by - December 21, 2022 0
  पुणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना आठवडाभरात अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश नागपूर : पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अयोध्या दौऱ्यावर

Posted by - April 9, 2023 0
राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल आयोध्येच्या दिशेने रवाना झाले होते त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अयोध्येसाठी रवाना…

पुण्यात ‘या’ तारखेला होणार महाविकास आघाडीची विराट सभा

Posted by - March 12, 2023 0
शिवसेनेचं मुळ पक्षचिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे गटाला मिळाल्यापासून ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आता तर थेट उद्धव ठाकरे मैदानात…

पीडितेने कोर्टासमोर ‘इन कॅमेरा’ दिलेली माहिती खोटी होती का ? चित्रा वाघ यांचा सवाल(व्हिडिओ)

Posted by - April 12, 2022 0
मुंबई – शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेनं खळबळजन खुलासा केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *