शिंदे गटाची पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव; ‘या’ मागणीने ठाकरे गटाला धक्का

998 0

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आणि राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच आता पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेत मोठी मागणी केली आहे.

शिवसेना भवन, शाखा, निधी आम्हाला द्यावा अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली असून 24 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्याची मागणी शिंदेंच्या शिवसेनेनं केली आहे असल्याची माहिती ॲड. आशिष गिरी यांनी दिली आहे.

ठाकरे गटाच्या याचिकेवर येत्या 24 एप्रिलला सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गटाने याचिका सादर केली होती. या याचिकेसोबत आता पुन्हा नवी याचिका कोर्टात दाखल झाली आहे. त्यामुळे कोर्ट येत्या 24 तारखेला गिरी यांचीही याचिका सुनावणीसाठी घेणार की या याचिकेवर इतर दिवशी सुनावणी ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

माझी याचिका ही शिंदे गटाची याचिका नाही. त्यांच्याशी काहीच संबंध नाही. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. मी एक वकील आहे. तसाच मी मतदार आहे. महाराष्ट्रातील मतदार आहे. त्यामुळे मी याचिका दाखल केली आहे. मी शिंदेंची बाजू घेत नाही. मी कायद्याची बाजू घेत आहे. उद्या उद्धव ठाकरेच अध्यक्ष राहिले तर शिवसेना भवन, शाखा आणि निधी त्यांच्याकडे जाईल. जर शिंदे अध्यक्ष झाले तर सर्व गोष्टी शिंदेंकडे जातील. पण तोपर्यंत या गोष्टींवर स्टे आणण्यात यावा, अशी माझी मागणी आहे, असंही गिरी यांनी स्पष्ट केलं.

 

Share This News

Related Post

कोविड काळात कंत्राटी वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना राज्य मंत्रिमंडळाचा दिलासा

Posted by - September 12, 2022 0
मुंबई : गेल्या दोन अडीच वर्षांपासून कोविड काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे. यामध्ये…

#PUNE ACCIDENT : बेल्हा-जेजुरी महामार्गावर भीषण अपघात; अपघातात माय लेकरासह एका तरुणाचा मृत्यू

Posted by - February 4, 2023 0
शिक्रापूर : बेल्हा जेजुरी महामार्गावर दुचाकीवरून जात असताना माय लेकराचा आणि आणखीन एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिक्रापूरच्या दिशेने…

धक्कादायक : अहमदनगरमध्ये वाळू तस्करी करणाऱ्या डंपरने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चिरडण्याचा केला प्रयत्न; फिल्मी थरार, सुदैवाने वेळेत ….

Posted by - December 23, 2022 0
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळूची तस्करी करणाऱ्या डंपरने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना…
Arrest

Breaking News ! पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकी देऊन खंडणी मागणारा गजाआड

Posted by - April 7, 2023 0
राजकीय नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी गजाआड केले आहे. भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे महाराष्ट्र…

विकासकामे वेगाने मार्गी लावू; निधीची अजिबात कमतरता नाही – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - October 15, 2022 0
पुणे : जिल्ह्यातील विकासकामे वेगाने मार्गी लावायची असून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. अधिकाधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी शासकीय निधीसोबतच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *