जे नष्ट होत नाही, जे शाश्वत राहते, तुकोबारायांचे अभंग शाश्वत आहेत, नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार (व्हिडिओ)

282 0

देहू- “देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्रच नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचा मार्गही प्रशस्त करते. या पवित्र स्थानाची पुनर्बांधणी केल्याबद्दल मी मंदिर ट्रस्ट आणि सर्व भक्तांचे आभार मानतो. जगातील सर्वात जुन्या जिवंत संस्कृतींपैकी भारत एक असल्याचा आम्हाला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रनायकाच्या जीवनात तुकारामांसारख्या संतांचा फार मोलाचा वाटा आहे. वीर सावरकरांना स्वातंत्र्यलढ्यात शिक्षा झाली तेव्हा तुरुंगात ते तुकारामजींचे अभंग म्हणत,चिपळी सारखे हातकडी वाजवत”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं वारकरी उपस्थित होते. यावेळी वारकऱ्यांनी संत तुकराम महाराजांचा नामघोष केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले आदी उपस्थित होते.

नरेंद्र मोदी म्हणाले, ” नरेंद्र मोदी म्हणाले, “मनुष्यजन्मात संतांचा सत्संग हा दुर्लभ असतो असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. संतांची कृपा झाली, तर भगवंताचा साक्षात्कार आपोआप होतो. आज देहू या पवित्र तीर्थक्षेत्री येताना मलाही असेच वाटत आहे. देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्रच नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचा मार्गही प्रशस्त करते. या पवित्र स्थानाची पुनर्बांधणी केल्याबद्दल मी मंदिर ट्रस्ट आणि सर्व भक्तांचे आभार मानतो”.

जे नष्ट होत नाही, जे शाश्वत राहते आणि काळाबरोबर संबंधित असते, ते अखंड असते. तुकोबारायांचे अभंग हे शाश्वत आहेत, असं मोदी म्हणाले.

शिळा मंदिराचा काय आहे इतिहास ?

जगदगुरु संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्यानंतर अभंग गाथा इंद्रायणीच्या पाण्यातून तरली आणि वर आली. तोपर्यंत तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्नपाणी ग्रहण केलं नाही. तोपर्यंत तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्नपाणी ग्रहण केलं नाही. तुकाराम महाराज 13 दिवस ज्या शिळेवर उपोषणाला बसले होते, तीच शिळा भाविकांच्या दर्शनासाठी तपोवन महाराजांनी देहू मंदिरात आणून ठेवली होती. त्या शिळेवर भव्यदिव्य मंदिर असावं असा वारकरी संप्रदायाचा आग्रह होता. म्हणून देहूतील मुख्य मंदिरात ही स्थापीत केली असून मंदिरास शिळा मंदिर असे संबोधले जात आहे.

मंदिरात स्थापित केलेल्या दगडाचे तुळशी वृंदावन आहे. पूर्वीच्या मंदिरात तुकाराम महाराजांची मूर्ती आणि मंदिरावर कळस नव्हता. त्या शिळा मंदिरात अखंड काळ्या पाषाणाची 42 इंच सुबक मूर्ती आहे. तर मंदिरावर 36 कळस स्थापन करण्यात आले आहेत. संत तुकाराम महाराजांचं आयुष्यमान 42 वर्षाचं असल्यानं शिळा मंदिराची कळसापर्यंतची उंची 42 फुटांची आहे. शिळा मंदिरातील संत तुकोबांच्या मूर्तीची उंची 42 इंच आहे. संत तुकोबांची काळ्या पाषाणातील ही मूर्ती 42 दिवसांमध्ये उभारली आहे. ही मूर्ती शिल्पकार चेतन हिंगे, पिंपरी-चिंचवड यांनी तयार केली आहे. सर्वोदय भारत शिल्पकला कन्ट्रक्शन ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हे मंदिर उभारणीचं काम देण्यात आलं होतं. मंदिराची रचना ही हेमाडपंथी आहे. मूळ गर्भगृह 14×14 एवढ्या आकाराचे आहे. अंतर गर्भगृह 9×9 उंची 17×12 एवढी आहे. मंदिराची उंची 42 फूट आहे. यासाठी एकूण खर्च हा 1 कोटी 17 लाख 47 हजार 500 रुपये आला आहे.

Share This News

Related Post

Sara Ali khan

Sara Ali khan : बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानचा अपघात; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

Posted by - March 6, 2024 0
मुंबई : सुपरस्टार सैफ अली खानची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali khan) येत्या काळात दोन मोठ्या चित्रपटांमध्ये…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांना श्रद्धांजली; मनामनात लावणीचे लावण्य पोहचवणारी सूरसम्राज्ञी

Posted by - December 10, 2022 0
मुंबई : “मराठी लोककलेचं लावण्य असणाऱ्या लावणीला घराघरांत आणि मनामनात पोहचवणाऱ्या सूरसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा…

टीईटी घोटाळ्यातील आरोपी तुकाराम सुपे याची जामीनावर सुटका

Posted by - May 31, 2022 0
पुणे- राज्यातील सर्वात मोठ्या शिक्षक भरती परीक्षा घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे याला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. सुपे परीक्षा…

खेलो इंडिया स्पर्धेत यशस्वी खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत वाढ-क्रीडा मंत्री सुनील केदार

Posted by - May 30, 2022 0
हरियाणा येथे होणाऱ्या चौथ्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत यशस्वी खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत वाढ करून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना ३ लाख, दुसऱ्या…
India Meet

India Meet : इंडिया आघाडीची समन्वयक समिती जाहीर; ‘या’ नेत्यांवर देण्यात आली जबाबदारी

Posted by - September 1, 2023 0
मुंबई : मुंबईमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक (India Meet) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये (India Meet) देशभरातील विरोधी पक्षाचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *