सांगलीमध्ये वीज कोसळून मेंढपाळासह दहा मेंढ्यांचा मृत्यू

589 0

सांगली – सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे शिवारात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळून मेंढपाळासह १० मेंढ्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली.

रामचंद्र गडदे असे या मेंढपाळाचे नाव आहे. रामचंद्र गडदे हे नेहमीप्रमाणे आपल्या मेंढ्या चारावयास घेऊन गेले होते. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल आणि विजांचा कडकडाट होत असल्याने ते लवकरच घरी परतत होते. गुरुवारी मेंढ्या चारुन घराकडे परतत असतानाच कवठेमहांकाळ जत रस्त्यावर पिंपळवाडी बस थांब्याच्या पुढे लोखंडी पुलाच्या जवळ नांगोळे गावच्या हद्दीत आले असता वादळी वारे व पाऊस जोरदार सुरू झाला. याच वेळी विजांचा कडकडाट होऊन रामचंद्र गडदे यांच्या अंगावर व मेंढयाच्या कळपावर वीज कोसळली त्यात गंभीर भाजल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच गडदे यांचा भाचा सुनील उबाले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने गडदे यांना रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Share This News

Related Post

Buldhana Crime News

Buldhana Crime News : बैलांना चारा टाकण्यासाठी गेले आणि समोरचे दृश्य पाहून पायाखालची जमीनच सरकली

Posted by - August 11, 2023 0
बुलढाणा : बुलढाण्यामध्ये (Buldhana Crime News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Buldhana Crime News) एका तरुणाने गळफास घेऊन आपल्या…
bhopal vote

Loksabha Election : महाराष्ट्रात 5 व्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.51% मतदान; ‘या’ ठिकाणी झाले कमी मतदान

Posted by - May 20, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. देशातील 49 जांगासह महाराष्ट्रातील 13 मतदारसंघासाठी मतदान…
Manoj Jarange Patil

Maratha Reservation : आता फक्त दोन दिवस; आरक्षण मिळालं नाही तर…, जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन

Posted by - October 22, 2023 0
जालना : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण…

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्वच्छतेसाठी कुणी मिळेल का ?

Posted by - July 21, 2022 0
पुणे : राज्यातील पहिली हरित इमारत (ग्रीन बिल्डिंग) म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची नोंद झाली आहे. राज्यात मंत्रालयानंतर अशाप्रकारची इमारत केवळ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *