शरद पवार यांनी नकार दिल्यास राष्ट्रपतीपदासाठी राजकीय परिघाबाहेरील उमेदवार निवडावा, शिवसेनेची भूमिका

306 0

नवी दिल्ली- केंद्रातील सत्ताधारी भाजपाने लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली असून सर्व विरोधकांनी राष्ट्रपतीपदासाठी सक्षम उमेदवार ठरवावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, असा शिवसेनेचा आग्रह आहे. पवार यांनी नकार दिल्यास राजकीय परिघाबाहेरील सर्वमान्य उमेदवार निवडावा, अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरविण्यासाठी नवी दिल्ली येथे आज पार पडलेल्या विरोधीपक्षाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार होते. . या बैठकीस माजी पंतप्रधान देवगौडा, ममता बॅनर्जी, मल्लिकार्जून खरगे, अखिलेश यादव, मेहबुबा मुफ्ती, सुभाष देसाई, ई करीम, जयराम रमेश, प्रफुल्ल पटेल, टी. आर. बालू, यशवंत सिन्हा, रणदीप सुरजेवाला, प्रियंका चतुर्वेदी, ओमर अब्दुल्ला, राजा आदी १८ नेते उपस्थित होते.

भाजपने घटनेची चौकट मोडण्यास सुरुवात केली आहे. देशाने ७५ वर्षांत जपलेली मूल्ये पायदळी तुडवली आहेत. संविधानिक यंत्रणांचा गैरवापर चालवला आहे. अशावेळी सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रपतीपदासाठी एकमुखाने उमेदवार ठरवावा व निवडून आणावा अशी भूमिका मांडण्यात आली.

“भाजपा विरोधातील पक्षांना एकत्र आणण्याची सुरुवात महाराष्ट्राने केली. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी ही सुरुवात केली. केवळ राष्ट्रपती निवडीसाठी नव्हे तर सर्व विरोधी पक्षांनी एकजूट मजबूत केली पाहिजे. शरद पवार यांनी ही निवडणूक लढवावी, असा शिवसेनेचा आग्रह आहे. त्यांचा नकार कायम राहिल्यास सर्वसामान्य, उज्वल प्रतिमेचा शक्य झाल्यास राजकीय परिघाबाहेरचा उमेदवार निवडावा” हे देशासाठी प्रतिष्ठेचे पद आहे म्हणून ही निवडणूक महत्वाची असल्याची भूमिका शिवसेना नेते तसेच राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केली.

यावेळी सर्व विरोधी पक्षाच्या वतीने संयुक्त निवेदन सादर करण्यात आले. केंद्रातील मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील आठ वर्षांपासून लोकशाही मूल्ये पायदळी तुडवत आहे. नागरिकांना दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. राज्यघटनेची चौकट मोडण्याची वारंवार प्रयत्न होत आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात वाईट सरकार असल्याची भावना यावेळी विरोध गटांतील नेत्यांनी व्यक्त केली. सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात हे सरकार अपयशी ठरले अशी भावना यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली.

केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील दरी वाढत चालली आहे, असे यापूर्वी कधीही घडले नाही. राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी राज्यपाल कार्यालयांचा वापर केला जात आहे. याला विरोध दर्शविण्यासाठी सर्व विरोधी राज्यातील मुख्यमंत्र्यांची ऑगस्ट महिन्यात परिषद घेण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Share This News

Related Post

Thane News

Thane News : उल्हासनगरमधील सेंच्युरी कंपनीमध्ये मोठा ब्लास्ट; 5 कामगारांचा मृत्यू

Posted by - September 23, 2023 0
ठाणे : ठाण्यामधून (Thane News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहाड परिसरात असलेल्या सेंच्युरी रेयॉन…

गंभीर : सहकारी साखर कारखाने खासगी मालकीचे करण्यातून 25 हजार कोटींचा गैरव्यवहार; आर्थिक गुन्हे शाखेची माहिती

Posted by - October 27, 2022 0
महाराष्ट्र : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक राज्य सरकार आणि काही जिल्ह्यांच्या बँकांच्या संगनमताने राज्यातील 49 सहकारी साखर कारखाने खाजगी मालकीचे…
Crime News

Crime News : दवाखान्यात घुसला अन् डॉक्टर दाम्पत्यावर… संपूर्ण परिसर हादरला

Posted by - October 1, 2023 0
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा या ठिकाणी एक खळबळजनक घटना (Crime News) घडली आहे. यामध्ये आरोपीने डॉक्टर…

पंतप्रधानांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तीव्र नाराजी, म्हणाले…

Posted by - April 27, 2022 0
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविडविषयक बैठकीत पेट्रोल व डिझेल वरील कराच्या मुद्द्यावरून बिगर भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना…

पंतप्रधानांचा कार्यक्रम वारकरी संप्रदायाचा होता की भाजपचा ? अंकुश काकडे यांचा सवाल

Posted by - June 14, 2022 0
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथे संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *