एवढे मंत्री, आमदार एकाचवेळी राज्याबाहेर गेल्याचे कळले कसे नाही ? शरद पवार संतापले

516 0

मुंबई- एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात आलं आहे. या सर्व घडामोडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या बैठकांवर बैठका होत आहेत. एवढे मंत्री, आमदार एकाच वेळी राज्याबाहेर गेलेच कसे ? याची कल्पना गृहखात्याच्या गुप्तचर विभागाला कशी समजली नाही असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला.

बुधवारी दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेठ घेतली. मुंबईमधील सिव्हर ओक या शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीमध्ये वळसे-पाटील यांनी यासंदर्भातील माहिती दिल्याचे समजते. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिल्लीत असणारे पवार हे मंगळवारी सायंकाळीच मुंबईत परतले. गुप्तचर विभागाला आमदार गुजरातमध्ये गेल्याची माहिती न मिळाल्याच्या मुद्द्यावरुन पवारांनी कठोर शब्दांमध्ये या बैठकीदरम्यान संताप आणि नाराजी व्यक्त केली.
एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कसं कळलं नाही? असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचं संरक्षण असणाऱ्या राजकारणी एका राज्यामधून दुसऱ्या राज्यात गेल्यास त्यांच्यासोबत असणाऱ्या विशेष सुरक्षा दलामधील व्यक्तींनी यासंदर्भातील माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणं बंधनकारक असतं. मात्र विरोधाभास म्हणजे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई सुद्धा बंडखोर आमदारांमध्ये असून ते सुद्धा सुरतला गेलेल्या आमदारांमध्ये आहेत.

संघर्षाची तयारी ठेवा – शरद पवार

आजही मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. सरकार गेलं तर संघर्षाची तयारी ठेवा, अशी सूचना शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदारांना केलीय. आज सकाळी शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबर काल झालेल्या बैठकीची माहितीही शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिली.

Share This News

Related Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुणे शहरात वाहतुकीत बदल

Posted by - April 13, 2023 0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी पुणे स्टेशन अरोरा टॉवर्स विश्रांतवाडी आणि सिंहगड रोड जंक्शन दांडेकर पुल परिसरातील…

समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा; अवघ्या 40 दिवसात 20 अपघात

Posted by - January 20, 2023 0
समृद्धी महामार्ग : 520 किलोमीटर लांब समृद्धी महामार्गाच ११ डिसेंबर 2022 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.…
narendra modi

Narendra Modi : PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; ग्रीसचा ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर’ पुरस्कार जाहीर

Posted by - August 25, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना ग्रीसच्या राष्ट्राध्यक्ष कॅटरिना एन. सकेलारोपोलू यांनी ‘ग्रँड क्रॉस ऑफ…

Pune News: ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची संस्कृती : मुरलीधर मोहोळ

Posted by - April 22, 2024 0
पुणे : आपल्या वडिलांनी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी श्रीरामांनी आपल्या राज्याचा चौदा वर्ष त्याग केला. माता शबरीची उष्टी बोरं खावून…

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात वाहतुकीत बदल; ‘या’ रस्त्यावरील वाहतूक राहणार बंद

Posted by - December 30, 2022 0
नववर्ष साजरे करण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन लष्कर भागात शनिवारी वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. तसेच शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *