शाहरुख खान याच्या डिग्रीचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणतात…… ‘ज्याची डिग्री खरी … ‘

2392 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री मागितल्याचा कारणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने दंड ठोठावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा विषय चर्चेत असताना, शाहरुख खानची डिग्री सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ट्विटरवर शाहरुख खानचा एक फोटो टाकण्यात आला असून त्यात त्याच्या हातात दिल्ली युनिव्हर्सिटीची डिग्री दिसत आहे.

सोशल मीडियावर सध्या अभिनेता शाहरुख खान याचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्याच्या हातात दिल्ली युनिव्हर्सिटी ( DU) ची डिग्री दिसत आहे. डिग्री हातात असल्यामुळे किंग खान फोटोमध्ये आनंदी दिसत आहे. शाहरुख खान याचा डिग्रीसोबत फोटो व्हायरल होत असल्यामुळे अभिनेत्याची तुलना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होत आहे. सध्या सर्वत्र शाहरुख आणि त्याच्या डिग्रीची चर्चा तुफान रंगत आहे. दरम्यान,

काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री सार्वजनिक करण्याची मागणी केली होती. मात्र गुजरात कोर्टाने यासाठी स्पष्ट नकार दिला. त्यांच्यावर कोर्टाने दंडात्मक कारवाई केली. त्यावर अरविंद केजरीवाल ट्विट करत म्हणाले, ‘देशाचे पंतप्रधान किती शिकले आहेत, हे जाणून घेण्याचा अधिकार देशाला नाही का? कोर्टात त्यांनी डिग्री दाखवण्यास विरोध केला, का? त्यांची डिग्री दाखवण्याची मागणी करणाऱ्यावरच दंड लावला? असं का घडत आहे? कमी शिकलेले पंतप्रधान देशासाठी खूप धोकादायक ठरू शकतात…’ असा इशारा अरविंद केजरीवाल यांनी दिला.

शाहरुख खान याचा हा फोटो खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. शाहरुखच्या डिग्रीच्या फोटोवर ‘ज्याची पदवी खरी आहे, तो ताठ मानेने जगतो…’ अशी कमेंट केलेली आहे.

 

Share This News

Related Post

#BREST CANCER : भारतासह जगभरात ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णसंख्येत वाढ ; काय आहेत कारणे आणि लक्षणे , महिलांनी अवश्य जाणून घ्या !

Posted by - February 13, 2023 0
#BREST CANCER : भारतासह जगभरात ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या वयाबरोबर महिलांमध्ये हा आजार दिसून येत आहे. स्तनाचा…

कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांचे संजय राऊतांना आव्हान; “हिम्मत असेल तर बेळगावमध्ये या, नाहीतर आम्ही तिकडे येतो…!

Posted by - December 7, 2022 0
बेळगाव : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आता पूर्णपणे विकोपाला गेला असल्याचीच चिन्हे आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकंदरीत परिस्थिती पाहता…

महाविकास आघाडी आणि शिवसेना अनिल परब यांच्या पाठिशी ठामपणे उभी- संजय राऊत

Posted by - May 26, 2022 0
मुंबई- राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास…

मराठवाडा, विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य; दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळविण्याच्या प्रकल्पाला जागतिक बॅंकेने अर्थसहाय्य करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - November 24, 2022 0
मुंबई : राज्यातील मराठवाडा, विदर्भ भागातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी प्रकल्पांसोबतच दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने…

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या तैलचित्राचे पुण्यात अनावरण

Posted by - May 29, 2022 0
पुणे- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत पुण्यात सावरकर यांच्या तैलचित्राचे पर्वती विधानसभा मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *