लैंगिक भावना उत्तेजित करणारा व्हिडीओ पाहणे आजोबांना पडले महागात

679 0

व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग आणि व्हिडीओ कॉल करून लैंगिक भावना उत्तेजित करणारा व्हिडीओ दाखविला.नग्न होण्यास भाग पाडलं आणि नंतर व्हिडीओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 4 लाख 66 हजार रूपये लुबाडल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे.

याप्रकरणी मॉडेल कॉलनीमधील एका ६४ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २१ ते २५ मार्च दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका कंपनीतून निवृत्त झाले आहेत. दि. २१ ते २५ मार्च दरम्यान ते घरी असताना त्यांना व्हॉट्सअॅपवर कॉल आला. त्यांच्याशी चॅटिंग आणि व्हिडीओ कॉल करून त्यांच्या लैंगिक भावना उत्तेजित होतील असा व्हिडीओ दाखविला आणि त्यांना नग्न होण्यास भाग पाडले.

फिर्यादी यांचा हा व्हिडीओ कॉल स्क्रीन रेकॉर्ड केला. त्यानंतर त्यांना हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्या पैसे मागण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे त्यांनी घाबरून ती सांगेल तसे पैसे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना सायबर सेल दिल्ली क्राईम ब्रँचमधून राम पांड्ये बोलत असल्याचे सांगून तुमचा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड होणार असून, पायल शर्मा हिने तक्रार दिल्याचे सांगितले.

त्यानंतर यूट्यूब प्रतिनिधीशी बोला, असे सांगून संजय सिंग नाव सांगणाऱ्याचा नंबर दिला. त्याने व्हिडीओ डिलिट करण्यासाठी दीड लाखाची मागणी केली. त्यांनी पैसे दिल्यावर आता तुमची केस मुंबई सायबर सेलला पाठविणार असल्याची भीती दाखवून त्यांच्याकडे ५ लाखांची मागणी केली. त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक चिंतामण तपास करीत आहेत.

Share This News

Related Post

pune police

PUNE: जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई

Posted by - December 30, 2022 0
पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने पुणे…
Satara Crime

Satara Crime : दुहेरी हत्याकांडाने सातारा हादरला ! अज्ञाताकडून पती- पत्नीची निर्घृणपणे हत्या

Posted by - October 8, 2023 0
सातारा : साताऱ्यातून (Satara Crime) एक दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.…

पंढरपुरात खासदार धनंजय महाडिक यांना मोठा धक्का; 11 पैकी सात ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता

Posted by - December 20, 2022 0
पंढरपूर : राज्यात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होतो आहे. आज राज्यातील 7000 हुन अधिक ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर…

सांताक्रुझ परिसरातील एलआयसी कार्यालयाच्या इमारतीला आग

Posted by - May 7, 2022 0
मुंबई- सांताक्रुझ परिसरातील एलआयसी कार्यालयाच्या इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या आठ गाड्या घटनास्थळी…
Akola Accident

Akola Accident : आमदार किरण सरनाईकांच्या कुटुंबाचा भीषण अपघात: 6 जणांचा मृत्यू

Posted by - May 3, 2024 0
अकोला : अकोला (Akola Accident) जिल्ह्यातील पातूर घाटातील नवीन बायपासवरील नानासाहेब मंदिरसमोर 2 कारची सामोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *