विद्यार्थ्यांसह बेपत्ता झालेली स्कूल बस सापडली; साडेचार तासानंतर समजला ठावठिकाणा

541 0

मुंबई- मुंबईच्या सांताक्रूझमधील पोदार स्कूलमधील विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली स्कूल बस बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली. दुपारी १२ वाजता शाळेतून निघालेल्या बसचा ठावठिकाणा अखेर संध्याकाळी साडेचार वाजता लागला. तोपर्यंत ही बस नॉट रिचेबल लागल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र, या दरम्यान स्कूल बस नेमकी कुठं होती, शाळेसोबत अथवा पालकांसोबत कोणताही संपर्क का झाला नाही असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

मुंबईतील सांताक्रूझमध्ये पोद्दार स्कूल आहे. या शाळेची विद्यार्थ्यांना ने-आण करणारी बस आहे. आज नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घरातून घेऊन शाळेत आली. दुपारी 12 वाजता शाळा सुटल्यानंतर, विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी ही बस निघाली. मात्र बस शाळेतून बाहेर जरी पडली असली तरी ती बस घरापर्यंत पोहोचलीच नाही. त्यामुळे पालक धास्तावले. पालकांनी तातडीने शाळेकडे धाव घेतली. या स्कूलबसच्या चालकाचा मोबाईल नॉट रिचेबल लागल्याने काळजीत आणखी भर पडली. शाळा सुटून जवळपास 4 तास होत आले तरी बसचा पत्ता लागला नव्हता. घटनेची माहिती मिळताच सांताक्रूझ पोलिसांनी शाळेमध्ये धाव घेतली.

अखेर संध्याकाळी साडेचार वाजता बसचा ठावठिकाणा समजला. त्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला. विद्यार्थी आता सुखरूप घरी पोहोचले आहेत. दरम्यान, पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. शाळेच्या फॅसिलीटीसाठी एवढे पैसे भरतो, पण मग अशी निष्काळजीपणा का ? असा सवाल पालकांनी उपस्थित केला. काही विद्यार्थ्यांना सिग्नलवर तर काही विद्यार्थ्यांना दुसऱ्याच परिसरात उतरवण्यात आल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे पालकांच्या संतापात भर पडली.

या संपूर्ण प्रकाराबाबत आशिष शेलार यांनी ट्वीट करत अधिक माहिती दिली आहे. स्कूलबसचा ड्रायव्हरव नवीन असल्यामुळे हा सगळा घोळ झाल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांनी म्हटलं आहे की,…

सांताक्रूझ येथील पोदार शाळेची बस बेपत्ता प्रकरणी मी पोलीस आयुक्त, डिसीपी या पोलीस यंत्रणांसह शाळेच्या प्रशासनाशी तातडीने बोललो… त्यातून जी माहिती समोर आली त्यानुसार बसचा ड्रायव्हर नवीन असल्याने नेहमीच्या मार्गापेक्षा अन्य मार्गाने बस गेली. विद्यार्थी सुखरूप असून आपापल्या पालकांकडे पोहचले आहेत. चिंता करण्याचे कारण नाही, असे पोलीस, शाळा यांनी सांगितले आहे. जरी असे असले तरी संबंधित ड्रायव्हर, बसचा कंत्राटदार यांच्यावर कारवाई करा, असे शाळेच्या प्रशासनाला सूचित केले आहे.

Share This News

Related Post

” पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात तेव्हा शिवसेनाप्रमुखांचे विचार आठवले नाहीत का ? ” रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

Posted by - September 1, 2022 0
मुंबई : उद्धव ठाकरे आणि बंडखोर आमदार यांच्यातील वाद रोजच नव्या रूपाने समोर येत असतात. शाब्दिक चिखल फेक सुरू असतानाच…

विद्यापीठात लवकरच ड्रोन विषयक विविध अभ्यासक्रम; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘ड्रोनआचार्य एरियल’ सोबत सामंजस्य करार

Posted by - March 15, 2023 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ड्रोनविषयक अभ्यासक्रमांना सुरुवात केली जाणार आहे. यामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदवी, पदविका अभ्यासक्रमांचा समावेश असणार…

शेतकऱ्यांना दिलासा : अतिवृष्टीमुळे पिंकाच्या नुकसानीसाठी 3 कोटी 18 लाख रुपयांचे निविष्ठा अनुदान वितरीत

Posted by - October 18, 2022 0
पुणे : अतिवृष्टीमुळे जून ते ऑगस्ट २०२२ दरम्यान जिल्ह्यातील ९ हजार १९२ शेतकऱ्यांच्या २ हजार २४७ हे. ८५ आर क्षेत्रावरील…

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते युवा महोत्सव आणि ‘चेतना’ केंद्राचे उद्धाटन

Posted by - September 30, 2022 0
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *