#Financial Year 2022-23 : एक लाखांपेक्षा अधिक कर वाचवा; हि कागदपत्र महत्वाची; अशी करा बचत, वाचा सविस्तर माहिती

1230 0

अर्थकारण : भारत सरकारने आर्थिक वर्ष 2022-23 साठी वैयक्तिक आणि व्यावसायिकाकडून भरण्यात येणारा आयटीआर दाखल करण्यासाठीच्या असेसमेंट फॉर्मची अधिसूचना जारी केली आहे. अर्थात गेल्या वर्षी हा अर्ज एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणला होता. प्राप्तीकर वाचवण्यासाठी अनेक प्रकारच्या गुंतवणूक आपल्याला मदत करत असतात. यापैकीच एक हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे एचआरएचा समावेश आहे. आपण नोकरदार असाल तर त्याचा लाभ उचलू शकता. एक लक्षात ठेवा, कर वाचवण्यासाठी एचआरएचा लाभ हा केवळ जुन्या कर व्यवस्थेत मिळू शकतो. नव्या व्यवस्थेत हा फायदा मिळत नाही.

अशा अटीत मिळेल फायदा

वेतनात हाऊस रेंट अलाउन्स म्हणजेच एचआरए हा करपात्र उत्पन्नाचा भाग आहे. प्राप्तीकर अधिनियम कलम 10 (13अ) नुसार कर सवलत मिळू शकते. यासाठी कागदपत्रे सादर करावी लागतात. एचआरएपासून किती कर वाचवू शकतो, यासाठी काही अटींचे आकलन करावे लागेल. ज्या अटींचे पालन केल्यानंतर किमान रक्कम आपल्या हाती पडेल, त्यात एचआरएच्या कर सवलतीचा लाभ मिळेल. पहिली गोष्ट म्हणजे वेतनात किती एचआरए आहे, ते पाहा. मेट्रो शहरात मूळ रक्कमेच्या 50 टक्के वाटा आणि नॉन मेट्रो शहरात वेतनाच्या 40 टक्के वाटा हा एचआरएचा असतो. तिसरी अट म्हणजे वार्षिक वेतनातून 10 टक्के वार्षिक भाडे कपात केल्यानंतर राहिलेली रक्कम.

अशी करा बचत

एचआरएमध्ये आपण किती कर बचत करू शकतो, यासाठी एक उदाहरण पाहू. एखादा व्यक्ती मुंबईत नोकरी करत असेल आणि भाड्याच्या घरात राहत असेल तर त्याला दरमहा 15 हजार रुपये भाडे भरावे लागते. त्याला कंपनीतून वार्षिक एक लाख रुपये एचआरए मिळतो. त्याचवेळी त्याची बेसिक सॅलरी 25 हजार रुपये असून महागाई भत्ता हा दोन हजार रुपये आहे. याप्रमाणे नोकरदार व्यक्ती हा कमाल एक लाख रुपयांची बचत करू शकतो.

हे कागदपत्रे गरजेचे

हाऊस रेंट अलाउन्सच्या माध्यमातून करसवलत मिळवण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर भाडे करार करणे गरजेचे आहे. या करारात मासिक भाडे, कराराचा कालावधी आणि खर्चाचा उल्लेख असणे गरजेचे आहे. हा करार शंभर किंवा दोनशे रुपयाच्या बाँडवर असणे आवश्यक आहे. वार्षिक भाडे एक लाखांपेक्षा अधिक असेल तर घरमालकाचे पॅनकार्ड असणे गरजेचे आहे. याशिवाय भाडे भरल्याचे पावत्या देखील असणे आवश्यक आहे. वार्षिक कमाई 50 लाख रुपयांपर्यंत असेल तर आयटीआर फायलिंगसाठी फॉर्म 1 भरावा लागेल. 50 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणार्‍या मंडळींना आयटीआर फार्म 2 भरावा लागेल.

Share This News

Related Post

#HEALTH WEALTH : साखरेची पातळी अचानक कमी होते का ? या टिप्स ताबडतोब रक्तातील साखरेची पातळी वाढवतील

Posted by - March 24, 2023 0
काम करण्यासाठी, खेळण्यासाठी किंवा अगदी सरळ विचार करण्यासाठी आपल्याला आपल्या रक्तातील साखर म्हणजेच रक्तातील ग्लुकोजमधून ऊर्जा आणि ऊर्जा आवश्यक असते.…

माजी आमदारांचे पेन्शन बंद केल्यानंतर ‘आप’ सरकारची पंजाबमध्ये नवीन घोषणा

Posted by - March 28, 2022 0
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पुन्हा एकदा पंजाब राज्यासाठी मोठी घोषणा केली आहे. आता राज्यातील जनतेला घरबसल्या रेशन मिळणार आहे.…

महत्त्वाची बातमी ! मुंबईत राज्यपालांच्या कार्यक्रमात वीजपुरवठा खंडित

Posted by - April 26, 2022 0
मुंबई- पडघा येथील वीजकेंद्रात बिघाड झाल्याने दादर, ठाणे, नवी मुंबई, बदलापूर भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. याचा फटका राज्यपाल भगतसिंह…

तिरुपती बालाजी देवस्थानने प्रथमच जाहीर केली संपत्ती; किती टन सोनं, ठेवी, मालमत्ता ? पाहा

Posted by - November 8, 2022 0
तिरुपती बालाजी : देशभरातील प्रसिद्ध असलेल्या मंदिरांमध्ये तिरुपती बालाजी मंदिराचं नाव नेहमीच घेतलं जातं.तिरुमला तिरुपती देवस्थानने प्रथमच खुलासा करत मंदिराची…

#PUNE : चांदणी चौकात वाहतूक कोंडी मोडीत काढली पण पादचाऱ्यांचं काय ? पादचाऱ्यांचा रोज होतोय जीवघेणा प्रवास

Posted by - February 16, 2023 0
पुणे : शहरातील पश्चिम भागातील महत्त्वाचा असलेल्या चांदणी चौक मध्ये वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून चांदणी चौकातील बावधन ते कोथरूड, व…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *