राज्यमंत्री दत्ता भरणे यांची ‘गलतीसे मिस्टेक’, सभेत देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख

505 0

इंदापूर- उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर आरूढ होऊन दोन वर्ष उलटली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून आता रूढ झालेले आहे. तरीसुद्धा महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर सभेमध्ये मोठी चूक केली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. भरणे यांनी मुख्यमंत्री म्हणून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख केला. पण स्टेजवर उपस्थित असलेल्यांनी ही चूक त्यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी आपली चूक सुधारली.

इंदापूर शहरात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष संजय सोनवणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते. तसंच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी आमदार जोगेंद्र कवाडे हे देखील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्या भाषणाची सुरुवात करताना राज्यमंत्री भरणे यांना चक्क मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी त्यांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केला. व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ यांनी तात्काळ दत्तामामांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर दत्तामामांनीही आपली चूक सुधारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख केला.

मात्र, दत्तामामा यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केल्यामुळे उपस्थितांमध्ये हशाही पिकला. तेव्हा भरणे यांनी स्वतःला सावरून घेत सतत डोक्यात खूप विचार सुरु असल्याने होतं असं कधीकधी, असं म्हणत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दत्तामामा इंदापूरचे आमदार होते आणि त्यावेळी फडणवीसांनी इंदापूरसाठी विकासनिधी देताना कायम हात सैल ठेवला होता. त्यामुळेच भरणेंच्या तोंडी आजही मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव आलं, अशीही चर्चा खासगीत रंगत आहे. तर दुसरीकडे माणूस आहे, त्यात दत्तामामांच्या मागे मोठा व्याप आहे. त्यामुळे झाली असेल चूक, असंही इंदापुरातील लोक म्हणत आहेत.

Share This News

Related Post

CHITRA WAGH : नाशिकच्या ‘त्या’ प्रकरणानंतर राज्यातील सर्व आधार आश्रमांचं ऑडिट व्हावं

Posted by - November 25, 2022 0
मुंबई : नाशिक जिल्ह्यातल्या एका आधार आश्रमातील संचालकानेच अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली.या घटनेनंतर.. राज्यातील सर्व आधार…

#PUNE POLITICS : आमदारकीची माळ गळ्यात पडल्यानंतर धंगेकर खासदारकीचे उमेदवार ? राजकीय वर्तुळात अशी आहे चर्चा …

Posted by - March 3, 2023 0
पुणे : कसब्यामध्ये तीस वर्षानंतर भाजपाला सत्ता गमवावी लागली. काँग्रेसचे धंगेकर यांनी भाजपच्या उमेदवाराविरुद्ध कडवं आव्हान उभं केलं होतं. त्याच…
Akshay Gavte

Buldana News : महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला सियाचीनमध्ये वीरमरण

Posted by - October 23, 2023 0
बुलढाणा : महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला सियाचीनमध्ये वीरमरण आले आहे. अक्षय लक्ष्मण गवते असे या जवानाचे नाव आहे. तो बुलढाणा (Buldana…
eknath Shinde

2024 ला नरेंद्र मोदी सर्व रेकॉर्ड मोडतील; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

Posted by - May 25, 2023 0
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या रत्नागिरीच्या (Ratnagiri) दौऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्यामध्ये ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे…

अजब लग्नाची गजब कहाणी ! 24 वर्षाची तरुणी करणार आत्मविवाह !

Posted by - June 2, 2022 0
वधू वराचे लग्न होते ही तर सामान्य गोष्ट आहे. यापूर्वी दोन मुलींनी एकमेकांशी लग्न केल्याची बातमी देखील तुम्ही वाचली असेल.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *