नागपूरचे वकील अॅड. सतीश उके यांच्या घरावर ईडीची धाड, कोण आहेत सतीश उके? (व्हिडिओ)

596 0

नागपूर – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे नागपूरचे वकील अॅड. सतीश उके यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्याची बातमी समोर आली आहे. मात्र या छापेमारी मागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, उकेंच्या घराबाहेर सीआरपीएफ जवानांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सतीश उके हे नागपुरचे हायप्रोफाईल वकील आहेत. 

पार्वती नगर भागातील निवासस्थानी आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास ईडी अधिकाऱ्यांनी छापा टाकला. सध्या ॲड सतिश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके घरी आहेत. नागपुरातील एका जमीन व्यवहाराच्या संदर्भात उकेंना क्राईम ब्रांचने नोटीस बजावली होती. या प्रकरणाशी संबंधित ही छापेमारी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ॲड. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने फोन टॅपिंग प्रकरणात केस लढवली होती. सतीश उके यांना हायप्रोफाईल वकील म्हणून ओळखलं जातं. अनेक मोठ्या प्रकरणात त्यांनी युक्तिवाद केला आहे. सतीश उके यांच्या घरावर ईडीने धाड टाकण्याने उके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

कोण आहेत सतीश उके ?

सतीश उके हे नागपुरचे हायप्रोफाईल वकील आहेत. सतीश उके यांची राजकीय वर्तळात उठबस आहे. त्यांचे राज्यातील अनेक नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचे बोलले जाते. उके पूर्वीपासूनच जमिनी गैरव्यवहारप्रकरणी नागपूर पोलिसांच्या रडारवर आहेत. 2018 साली त्यांना एका जमीन गैरव्यवहारप्रकरणी अटकही झाली होती. एका वृद्धेला धमकावून त्यांची दीड एकर जमीन स्वतःच्या आणि स्वतःच्या भावाच्या नावावर केल्याचा आरोप उके यांच्यावर आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्हे लपवल्याच्या विरोधात उकेंनी याचिका दाखल केली होती. नितीन गडकरींसह इतर भाजप नेत्यांविरोधातही उकेंकडून याचिका दाखल करण्यात आली होती. तेलगी घोटाळ्यातही मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा सहभाग असल्याचा आरोप उके यांनी केला होता. यासंदर्भात उकेंनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलेले होते.

Share This News

Related Post

मानवाधिकारांवर जयशंकर यांनी अमेरिकेला दिले सणसणीत प्रत्युत्तर

Posted by - April 14, 2022 0
वॉशिंग्टन- अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात शीखांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांदरम्यान भारताच्या कथित मानवाधिकार उल्लंघनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अमेरिकेला भारताचे परराष्ट्र मंत्री…

ईश्वरसाक्ष शपथ घेतो की! राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार; कोणाची लागणार मंत्रिमंडळात वर्णी ?

Posted by - August 9, 2022 0
राज्यात झालेल्या सत्ता संघर्षानंतर अखेर 30 जूनला राज्यामध्ये शिंदे फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. आज…

पुण्यामध्ये आर्थिक व्यवस्थेला दिशा देणारे संशोधन केंद्र उभारण्यात येणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - November 26, 2022 0
पुणे : पुण्यामध्ये ५ एकर क्षेत्रामध्ये इथल्या आर्थिक व्यवस्थेला दिशा देणारे संशोधन केंद्र उभारण्यात येणार असून यासाठी उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी…

महसूल तसेच भूमी अभिलेखांशी संबंधित सुधारणांचे प्रस्ताव सादर करा – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Posted by - September 24, 2022 0
पुणे : जमीन मोजणी, सात-बारा संगणकीकरण, ई-फेरफार आदी महसूल तसेच भूमी अभिलेखांशी संबंधित बाबींमध्ये कालानुरूप सुधारणा करत राहणे आवश्यक असून…

मुंबईमध्ये वातानुकूलित लोकल प्रवास तिकिटात ५० टक्के कपात, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा

Posted by - April 29, 2022 0
मुंबई – मुंबईकरांसाठी कडक उन्हामध्ये थंडावा देणारी आनंदाची बातमी. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *