मुख्यमंत्री कार्यालयातून ससून रुग्णालयात फोन…. दिला हा आदेश… काय आहे प्रकरण ?

332 0

कोणत्याही सरकारी कार्यालयात मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्यानंतर जशी अधिकाऱ्यांची धावपळ उडते तशीच सोमवारी संध्याकाळी ससून रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची उडाली. ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातांना लॅण्डलाईनवर फोन आला आणि पलीकडून फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने चक्क आदेश दिला.

सोमवारी संध्याकाळी ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातांना लॅण्डलाईनवर फोन आला. फोन करणाऱ्याने आपण मुख्यमंत्र्यांचे पीए असल्याचे सांगितले. फोन करणारा तब्बल पाच मिनिटे बोलत होता. त्याने सर्व माहिती घेतली. त्यानंतर त्या व्यक्तीने मग ससूनच्या आवारातील दोन कँटीन तातडीने बंद करण्याची आदेशवजा सूचना दिली.

अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यापर्यंत ही बाब गेल्यानंतर त्यांना या प्रकाराचा संशय आला. त्यांनी खात्री करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात फोन लावला त्यानंतर हा कॉल फेक असल्याचा उलगडा झाला. तत्पूर्वी ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी संध्याकाळी कँटीन समितीची बैठक घेतली होती. चार कँटीनच्या निविदेची मुदत संपल्याने ती बंद करणार असल्याबाबत त्यात चर्चा झाली होती. त्यातूनच कुणीतरी हा फेक कॉल केला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

याबाबत पोलिसांकडे कोणतीही तक्रार केली नसून अशा प्रकरणात वेळ वाया न घालवता त्यापेक्षा रुग्णांच्या शस्त्रक्रिया जास्त महत्त्वाच्या आहेत, असे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर म्हणाले.

 

Share This News

Related Post

Pune Ganeshotsav 2023

Pune Ganeshotsav 2023 : पुण्यात गणपती वर्गणीच्या नावाखाली किराणा दुकानदाराला मारहाण; 4 जणांवर गुन्हा दाखल

Posted by - September 12, 2023 0
पुणे : गणेशोत्सव (Pune Ganeshotsav 2023) काही दिवसांवर येऊन ठेपले असताना पुण्यातून एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये गणेशोत्सव वर्गणीच्या…
Supriya-Sule

“गडकरी साहेब…! पुणे -सोलापूर महामार्गाकडे लक्ष द्या” – खासदार सुप्रिया सुळे

Posted by - November 9, 2022 0
पुणे : वाहतूक कोंडी ,वर्दळ, अरुंद रस्ते ,खराब रस्ते ,अपघात यांचे प्रश्न शहरात आणि शहरांबाहेर देखील ऐरणीवर येत असताना आता…
Pune News

Pune News : इंद्रायणी नदीत बुडून निगडी येथील दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 3, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे पोहण्यासाठी इंद्रायणी नदी पात्रात…
Chandrakant Patil

Chandrakant Patil : नामदार चंद्रकांतदादा पाटील मिलिंद तुळाणकर यांच्या जलतरंगाने प्रभावित

Posted by - October 26, 2023 0
पुणे : नामदार चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी आज मिलिंद तुळाणकर यांची सदिच्छा भेट घेऊन, त्यांच्या कलासाधनेला नमन करून विशेष…

कलकत्ता उच्च न्यायालयाचा मोठा निर्वाळा; ‘वंध्यत्व’ घटस्फोटाचा आधार होऊ शकत नाही !

Posted by - January 21, 2023 0
कलकत्ता : आजच्या युगात देखील वंध्यत्वामुळे अनेक गुन्हेगारी वृत्त उजेडात येत आहेत. काळी जादू ,आघोरी पूजा ,हत्या अशा गुन्ह्यांसह मूल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *