ब्रेकिंग ! ‘… तुझे एके 47 से उडा देंगे’, संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी..

735 0

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पंजाबमधील खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ही धमकी देण्यात आली असून त्यात एके ४७ ने हत्या करण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. संजय राऊत यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आला आहे.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्याप्रमाणेच दिल्लीत संजय राऊतांचीही हत्या करण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. ‘दिल्ली में मिल तुझे एके 47 से उडा देंगे’ अशी धमकी या मेसेजमधून देण्यात आली आहे. ही धमकी आल्यानंतर संजय राऊत यांनी तात्काळ मुंबईचे पोलीस आयुक्त आणि विशेष आयुक्त यांना माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

प्राथमिक माहितीनुसार, धमकी देणारी व्यक्ती पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या धमकीनंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

आपल्याला आलेल्या धमकीनंतर संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. संपूर्ण सुरक्षा यंत्रणा गद्दार गटाच्या सुरक्षेसाठीच आहे. राज्यातील कायदा व सुवव्यस्थेचा बोजवारा उडाला आहे. विरोधकांना आलेल्या धमक्या सरकार गांभीर्याने घेत नाही.  सलमान खानला धमकी दिलेल्या गँगकडून मला धमकी आली आहे. विरोधकांना मारून टाकण्याचा सरकारचा डाव असल्याचा घणाघात धमकीनंतर संजय राऊत यांनी केला आहे.

“गेल्या महिन्यातच संजय राऊतांनी गृहमंत्र्यांना यासंदर्भात सूचना दिली आहे की त्यांच्या जीवाला धोका आहे. सरकार या सगळ्या धमकी प्रकरणाला गांभीर्याने न घेता ज्या प्रकारे वक्तव्य केली गेली, ती चुकीचीच होती. संजय राऊत या सगळ्याच्या विरोधात तीव्र लढा देत आहेत. त्यामुळेच अशा धमक्या येत आहेत. सरकारने याची लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.

Share This News

Related Post

विद्यार्थ्यांसह बेपत्ता झालेली स्कूल बस सापडली; साडेचार तासानंतर समजला ठावठिकाणा

Posted by - April 4, 2022 0
मुंबई- मुंबईच्या सांताक्रूझमधील पोदार स्कूलमधील विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली स्कूल बस बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली. दुपारी १२ वाजता शाळेतून निघालेल्या बसचा…

दोन वर्षानंतर प्रथमच बारावी बोर्डची ऑफलाईन परीक्षा

Posted by - March 4, 2022 0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यातील 9,635 परीक्षा केंद्रावर…
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : …नाहीतर खूप जड जाईल, जरांगे पाटलांनी सांगितला आंदोलनाचा पुढचा प्लॅन

Posted by - October 30, 2023 0
जालना : मराठा आरक्षणचा मुद्दा दिवसेंदिवस पेटताना दिसत आहे. आज मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा 6…
Suicide

धक्कादायक ! पुण्यात सुसाईड नोट लिहून बी.ए.च्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Posted by - May 15, 2023 0
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.विश्रांतवाडी (Vishrantwadi) येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणार्‍या विजय नांगरे या विद्यार्थ्याने…

यंदाच्या वारीत महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक विशेष अत्याधुनिक सोयीसुविधा; महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्यवारी’ अभियानाचा पुण्यातून शुभारंभ

Posted by - June 19, 2022 0
आगामी पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिला वारकऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या ‘आरोग्यवारी’ उपक्रमाचा शुभारंभ पुण्यातील पालखी विश्रामस्थळ असलेल्या निवडुंगा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *