SANJAY RAUT : या सरकारमध्ये शिवाजी महाराजांचा अपमान कोण करेल अशी स्पर्धा सुरू आहे….! राऊतांची तोफ धडाडली

223 0

मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यामुळे वातावरण चिघळते आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अशा आक्षेपार्ह विधानांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा सनकून जाब विचारला आहे.

यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले की, “राज्यातील पर्यटन मंत्र्याला तरी महाराजांच्या इतिहासाची जाणीव असायला पाहिजे होती. ते शिवाजी महाराजांची तुलना बेईमान व्यक्ति सोबत करतात. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीत जा. ठराव मंजूर करा. हे मूग गिळून महाराजांचा अपमान सहन करतात. पण आम्ही हे सहन करणार नाही. शिवरायांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. असे यावेळी संजय राऊत म्हणाले आहेत.

तसेच खोके सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये कोण शिवाजी महाराजांचा अपमान करेल यासाठी स्पर्धा सुरू आहे. कोण बनेगा करोडपती प्रमाणे दिल्लीने सांगितले म्हणून हे शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अपमान करत आहेत असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

Share This News

Related Post

sharad pawar

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

Posted by - May 7, 2023 0
पंढरपूर : पंढरपूर जिल्ह्यात एक मोठी राजकीय घटना घडली आहे. पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील…

सोमय्यांनी सादर केली रश्मी ठाकरेंनी लिहिलेली ‘ती’ दोन पत्रे, काय आहे त्या पत्रात ?

Posted by - February 21, 2022 0
मुंबई- भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा कोर्लई गावातील 19 बंगल्यांच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. आज सोमय्या यांनी…

दहावीचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल 96.94% यंदाही मुलींची बाजी (व्हिडिओ)

Posted by - June 17, 2022 0
पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यात ९६.९४ टक्के…

अबब ! राज्यात सर्वाधिक बोगस शिक्षक ; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस शिक्षक

Posted by - March 16, 2022 0
नाशिक- आरोग्य परीक्षा, म्हाडा परीक्षा आणि आता टीईटी (TET) शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणाने राज्यातील पालकांची झोप उडाली आहे. पुणे पोलिसांनी…

MLA Pratap Sarnaik : “मुलं आणि सुनांच व्यवस्थित होऊ दे..”, तुळजाभवानी मातेला 51 तोळ्याच्या पादुका आणि 21 तोळ्याचा हार देऊन फेडला नवस

Posted by - November 24, 2022 0
उस्मानाबाद : शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज सहकुटुंब तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीला 75 तोळे सोनं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *