अयोध्या दौरा स्थगितीवर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना डिवचले ! म्हणाले…

317 0

मुंबई- गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आलेला आहे. त्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची कळ काढली आहे. राज ठाकरे यांना अयोध्या दौरा रद्द करण्याची नामुष्की यावी असे मी काही म्हणणार नाही पण भाजपने असे का करावे असा प्रश्न विचारून त्यांनी भाजपला देखील टोला लगावला आहे. संजय राऊत प्रसार माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांच्यावर तिरकस शब्दात टोलेबाजी केली.

संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात नेमक्या काय अडचणी आल्या, हे मला माहीत नाही. मात्र भाजपने त्यांच्या बाबतीत असं का करावं? यातून काही लोकांना शहाणपण आलं तर बरं होईल. कारण यामुळे महाराष्ट्रातील नेतृत्वाचं आणि महाराष्ट्राचं नुकसान होतं. प्रत्येक वेळी भाजप राजकीय स्वार्थासाठी अशा खेळी करते. आपण वापरले जात आहोत हे काही लोकांना उशीरा समजले आहे. आम्हाला या मुद्द्यावरून राजकारण करायचं नाही. आमचा एक मदत कक्ष आहे, कोणाला देवदर्शनाला जायचं असेल तर आम्ही मदत करतो,’ असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

दौऱ्याची घोषणा होताच उत्तर भारतातून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यात आला. अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध आहे. “आधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतर त्यांनी अयोध्येत यावं”, असं भाजप खासदार म्हणतात. तर मुस्लिम पक्ष आणि बाबरी मशिद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांनी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यालाही विरोध केला होता.

Share This News

Related Post

राज्यात विविध ठिकाणी जिल्हा तसेच दिवाणी न्यायालये स्थापन करणार, पदनिर्मितीसही मान्यता

Posted by - October 12, 2022 0
माणगाव, रामटेक, इगतपुरी, बेलापूर, कर्जत, वाई, येवला, परांडा येथे न्यायालये स्थापन करून पदनिर्मिती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात…

पुणे : भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचं निधन; अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी

Posted by - December 23, 2022 0
पुणे : भाजपाच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं गुरुवारी निधन झाले. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास…

गटनेतेपदी अजय चौधरीच ! विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची मान्यता, शिंदे गटाला धक्का

Posted by - June 24, 2022 0
मुंबई- महाराष्ट्रात एकीकडे सरकार टिकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये खलबतं सुरु आहेत. तर दुसरीकडे पक्ष वाचवण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे…

धनुष्यबाण चिन्हाचा आज निर्णय : केंद्रीय निवडणूक आयोगासमोर 4 वाजता युक्तिवाद होणार सुरू

Posted by - January 17, 2023 0
मुंबई : धनुष्यबाण चिन्हाचा आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर फैसला होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजची सुनावणी ही सर्वाधिक महत्त्वाची मानली…

मुंबई : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाचा घेतला आढावा

Posted by - November 17, 2022 0
मुंबई : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दादर येथील महापौर बंगल्याच्या आवारात एक विशेष बैठक आयोजित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *