संजय राऊत पुन्हा अडचणीत; अल्पवयीन पीडीतेचा फोटो ट्विट केल्याने संजय राऊतांच्या विरोधात गुन्हा दाखल

393 0

सोलापूर : खासदार संजय राऊत यांच्या विरोधात पीडितेचा फोटो ट्विटरवर शेअर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन अत्याचारित पीडित मुलीची ओळख जाहीर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला . बार्शी शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडितेचा एक फोटो शेअर करून संजय राऊत यांनी लिहिले होते की, मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका भाजप पुरस्कृत गुटणे हा जीवघेणा हल्ला केला आहे अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत पाच मार्चला हा हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत. असे लिहून त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला होता.

यावर भाजपने त्या चित्रा वाघ यांनी रित्विट केले असून लिहिले आहे की, ओ सर्वज्ञानी……खोटी माहीती देत का जनतेची दिशाभूल करताय…..?? सगळ्या पुड्या संपल्या का तुमच्या आता महिलांवर आलात

या प्रकरणात दोन्ही आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करत अटक झाली आता ही आरोपी जेलमध्ये आहेत ही वस्तुस्थिती असतांना का तुम्ही खोटी माहीती देताय…

आरोपी भाजपपुरस्कृत म्हणता अहो आरोपी भाजपचं काय पण कुठल्याही पक्षाशी संबंधीत नाहीत…..१०३ दिवसांसाठी आत काय गेलात मती गुंग झाली तुमची…

पिडीतांना जाती जातीत वाटणारे तुम्ही कोण ….?

आमच्यासाठी पिडीता ही फक्त मुलगी असते व या घटनेतील मुलगी सुरक्षित आहे तिची तब्येतही स्थिर आहे

सगळ्यात महत्वाचं तुम्ही पिडीतेचा फोटो कसा काय viral केलात …??

आता कुठे गेले सगळे आम्हाला कायदे शिकवणारे….

@Maha_MahilaAyog
आयोग झोपलेत काय ?
कधी पाठवतायं मग नोटीस या सर्वज्ञानींना कि त्या फक्त आमच्यासाठी आहेत ??

मा.गृहमंत्री जी
@Dev_Fadnavis

@DGPMaharashtra
यांच्याकडे मागणी आहे तात्काळ या संजय राऊतांवर कारवाई करा…

याप्रकरणी आता संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. असून याप्रकरणी चार पोलीस कर्मचारी देखील निलंबित करण्यात आले आहेत. या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोन आरोपींवर पक्ष कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु या आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी या आरोपींनी पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला या हल्यात ती गंभीर जखमी झाली. पोलिसांनी या आरोपींना तात्काळ अटक करणे गरजेचे होते. कदाचित त्यानंतर हा हल्ला होऊ शकला नसता. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या चार पोलीस कर्मचाऱ्यांचा निलंबन करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

धक्कादायक ! फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पोलिसाने केला इंजिनीयर महिलेवर बलात्कार

Posted by - April 23, 2022 0
पोलीस कर्मचारी विक्रम फडतरे याने इंजिनीयर महिलेला फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पोलिसाने इंजिनीयर महिलेवर बलात्कार केला. तसेच तिचे…
jitendra-awhad

Jitendra Awhad : आमच्या पक्षानं ‘तुतारी’ हे चिन्ह मागितलंच नव्हतं; जितेंद्र आव्हाड यांचा धक्कादायक खुलासा

Posted by - February 23, 2024 0
ठाणे : ‘निवडणूक आयोगाकडे आमच्या पक्षानं ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह मागितलंच नव्हतं. आम्ही इतर तीन चिन्हं सुचवली होती, पण…

विवाहानंतर पॅनकार्डमध्ये नवीन नाव आणि पत्ता अपडेट करणे गरजेचे; अन्यथा…

Posted by - October 29, 2022 0
विवाहानंतर मुलीचे घर बदलते आणि आडनावही. अर्थात आडनाव बदलणे आवश्यक नाही, परंतु विवाहानंतर आडनावात बदल होत असेल तर पॅनकार्डमध्ये अपडेट…

Maharashtra Politics : “सरपंच ,नगराध्यक्षांच्या थेट निवडी झाल्यास पराभावाची भीती…”!देवेंद्र फडणवीस यांनी कोणावर केली टीका पाहा…

Posted by - July 16, 2022 0
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्रीमंडळात झालेले महत्त्वाचे निर्णय सांगितले. यावेळी सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड थेट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *