विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन बँक, गुड टच-बॅड टचचे शिक्षण ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा उपक्रम

182 0

पुणे : ७ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन बँक, गुड टच – बॅड टचचे शिक्षण देणारा उपक्रम महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान, धायरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. आज विविध शाळांतील १८०० मुली यात सहभागी झाल्या.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून विद्यार्थिंनींसाठी ‘सॅनिटरी नॅपकिन बँक – आपल्या आरोग्यासाठी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यात शालेय तसेच महाविद्यालयीन मुलींना मोफत दरमहा सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात येत आहे. यासाठी शाळा – महाविद्यालये यांच्याशी समन्वय ठेवण्यात येतो. मुलींची नोंदणी करुन त्यांना ओळख पत्र दिले जाते. दर महिन्याला ओळख पत्र दाखवत, नोंद करुन घेत शाळा – महाविद्यालयातच मुलींना सॅनिटरी पॅड मिळते.

आज झालेल्या कार्यक्रमात सॅनिटरी नॅपकीन बॅंकसाठी नोंदणी करण्यासोबतच मुलींना गुड टच – बॅड टचचे शिक्षण देणारी विडियो फिल्मही दाखविण्यात आली. यावेळी डॅाक्टरांच्या टीमकडून मुलींना सॅनिटरी नॅपकिनचा वापर, चांगले आरोग्य राखण्यासाठी काळजी याबाबत ही मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी बोलताना आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “मुलींना योग्य शिक्षण मिळाले तर सक्षमतकडे वाटचाल सुरु राहते. त्यांच्या शिक्षणात, आरोग्यात अडथळे येउ नये यासाठी आयोगाकडून सॅनिटरी नॅपकीन बॅंक उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या बॅंकेत मुलींना दरमहा शाळेतच नॅपकीन्स दिले जातात. शालेय शिक्षण सुरु असतानाच त्यांचे आरोग्य जपण्याचा हा प्रयत्न आहे. स्त्रियांना उपजत स्पर्शाची जाणीव असतेच पण लहान वयातच याबाबत मुलींना जागरुक, सतर्क केल्यास अनेक गोष्टी रोखता येउ शकतात. मुलींना सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम करण्याच्या उद्देशाने गुड टच – बॅड टच बाबत विडियो फिल्ममधून शिक्षण देण्यात येत आहे. विविध शाळांमधे मिळणारा उत्स्फुर्त प्रतिसाद आमचा ही उत्साह वाढवणारा आहे.”

आज काका चव्हाण शाळा, धायरी, शिवभूमी शाळा, खेडशिवापूर, महात्मा गांधी विद्यालय, खानापूर, यशवंत विद्यालय, खडकवासला, विमलाबाई नेर्लेकर विद्यालय, रामनगर खडकवाडी या ५ शाळांमधे झालेल्या कार्यक्रमात १८०० मुलींची नॅपकीन बॅंकेत नोंदणी करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

Quality Education

Quality Education : गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्व सामान्यांना परवडणारे बनवा; आयआयटी मद्रासचे संचालक प्रा डॉ. व्ही कामकोटी यांचे आवाहन

Posted by - July 14, 2023 0
पुणे : भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण (Quality Education) सुलभ आणि परवडणारे बनविण्यावर सर्वाधिक भर दिला जावा. शालेय विद्यार्थ्यांचे नोंदणी…

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांवर बंधनकारक, पण या निर्णयाचा आदर राखला जाईल का ? – ऍड प्रकाश आंबेडकर

Posted by - September 28, 2022 0
पुणे – शिवसेनेच्या संदर्भात काल सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वानाच बंधनकारक आहे. परंतु या निर्णयाचा आदर राखला…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाषाण भागातील विविध विकास कामांचं उद्घाटन

Posted by - April 9, 2022 0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाषाण भागातील निम्हण मळा ते आयव्हरी इस्टेट ३० मीटर रस्त्याच्या कामाचे तसेच स्मशानभूमी नूतनीकरण आणि…
Neelam Gorhe

दीपावलीच्या निमित्ताने राज्यातील शेतकरी महिला, उद्योजक यांच्या शेतमालाला भाव आणि असंघटित कामगारांसाठी सरकारने धोरण आखावे

Posted by - October 23, 2022 0
केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार सुमारे ८० टक्के महिला आर्थिक क्षेत्रात सक्रिय आहेत. यात कृषी क्षेत्रात ३३…

थरारक ! माथेफिरूने चालत्या रेल्वेत सहप्रवाशांवर पेट्रोल ओतून लावली आग, तिघांचा मृत्यू

Posted by - April 3, 2023 0
एका माथेफिरूने चालत्या रेल्वेत सह प्रवाशांवर पेट्रोल टाकून आग लावली. या घटनेत एक महिला, दोन वर्षाची एक मुलगी आणि एका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *