Breaking News एकाच कुटुंबातील ९ जणांची विष प्राशन करुन आत्महत्या, सांगली जिल्ह्यातील धक्कादायक घटना

426 0

सांगली- मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये ही घटना घडली आहे. दोन सख्ख्या भावांनी कुटुंबासह विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. मात्र आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोपट यल्लापा वनमोरे (52),संगीता पोपट वनमोरे (48),अर्चना पोपट वनमोरे (30),शुभम पोपट वनमोरे (28),माणिक यल्लापा वनमोरे (49),रेखा माणिक वनमोरे (45),अनीता माणिक वनमोरे (28),आदित्य माणिक वनमोरे (15),अक्काताई वनमोरे(72)

माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोन सख्ख्या भावांच्या संपूर्ण कुटुंबातील हे सर्व मृतदेह आहेत. रविवारी रात्री नऊ जणांनी विष पिऊन जीवन संपवलं. मृतांमध्ये आई, पत्नी आणि मुलांचाही समावेश आहे. सोमवारी सकाळी मृतदेह आढळल्यानंतर घटना उघडकीस आली. एका खोलीत तीन मृतदेह तर दुसऱ्या खोलीत 6 मृतदेह सापडले.

आतापर्यंतच्या तपासात कोणाच्याही अंगावर जखमेच्या खुणा आढळलेल्या नाहीत. प्राथमिक माहितीनुसार दोन्ही भावांच्या कुटुंबीयांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र अद्याप घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.

 

Share This News

Related Post

Meghna Bordikar

Meghna Bordikar : आमदार मेघना बोर्डीकर यांना ‘भारत गौरव पुरस्कार’ जाहीर

Posted by - May 9, 2023 0
परभणी : लंडन येथील भारतीयांच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘भारत गौरव पुरस्कार’ (bharat gaurav award) यंदाच्या वर्षी…

आश्चर्यकारक ! चीनच्या लोकसंख्येत प्रथमच घट ! भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक ?

Posted by - January 19, 2023 0
चीन : जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या चीनच्या लोकसंख्येत 2022 मध्ये 8 लाख 50 हजार एवढी घट झाली आहे. 1961…

ग्रामपंचायत निवडणूक काळात एसटी महामंडळ मालामाल; पुणे विभागानं किती कमावलं उत्पन्न ?

Posted by - December 21, 2022 0
पुणे : राज्यात झालेल्या 7751 ग्रामपंचायत निवडणुकीत राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला चांगलाच फायदा झाला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये एसटीला एसटी…

अवैध हातभट्टी बंद करण्यासाठी मोहिम राबवा – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

Posted by - September 22, 2022 0
पुणे : जिल्ह्यातील अवैध हातभट्टीच्या माध्यातून होणारी मद्यविक्री संपूर्णपणे बंद करण्यासाठी मोहिम राबवावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *