महत्वाची घडामोड ! संभाजीराजे छत्रपती मुंबईच्या दिशेने रवाना ! मुख्यमंत्र्यांची घेणार भेट ?

154 0

कोल्हापूर – संभाजीराजे छत्रपती यांनी सकाळी आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे, अशी माहिती दिली. तसेच, मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा मान राखतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. यानंतर संभाजीराजे छत्रपती हे तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. सविस्तर बातमी थोड्याच वेळात…

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने सहावा उमेदवार देण्याचे जाहीर केले. तसेच या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करून त्याची घोषणा केली जाणार असतानाच या राजकीय नाट्याला कलाटणी मिळाली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी सकाळी आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे, अशी माहिती दिली. तसेच, मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा मान राखतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती.

यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर संभाजीराजे कोल्हापूरहून मुंबईला निघाले आहेत. आज सायंकाळी मुख्यमंत्री आणि संभाजीराजे याची भेट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, संभाजीराजे शिवबंधन बांधून शिवसेनेकडून उमेदवारी स्वीकारतील की अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यसभेसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांच्या नावाची चर्चा

राज्यसभेसाठी शिवसेना कोणाच्या नावाची घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यात संजय पवार यांच्या नावाचीही चर्चा आहे. यावर बोलताना संजय पवार म्हणाले की, माझ्या नावाची चर्चा असल्याचं मला माध्यमांकडूनच कळालं. मला संधी मिळाली तर नक्की चांगलं काम करून दाखवू’

‘मी ३० वर्ष शिवसेनेसोबत काम केलं. आम्ही मातोश्रीला नेहमी दैवत म्हणून पाहिलं आहे. काही मिळावं यासाठी कधीही काम केलं नाही. १५ वर्ष नगरसेवक, १४ वर्ष जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख म्हणून काम पाहिलं, तालुका प्रमुख म्हणून काम पाहिलं. सर्वसामान्य शिवसैनिकाला उच्चस्तरावर नेणारा हा पक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात पद देण्याबाबत काही असेल तर देतील. नाही दिलं तरी शिवसैनिक म्हणून काम करण्याची तयारी’ असंही यावेळी संजय पवारांनी स्पष्ट केलं.

Share This News

Related Post

Vijaysinh Mohite–Patil

Loksabha News : भाजपला मोठा धक्का ! मोहिते पाटील करणार शरद पवार गटात प्रवेश

Posted by - March 27, 2024 0
माढा : महाराष्ट्राच्या राजकारणातुन (Loksabha News) एक मोठी बातमी समोर आली आहे. अकलूजचे मोहिते पाटील लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रावादी…

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद : “तुमच्याकडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नाहीत आणि महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा करता ?” दीपक केसरकर यांचा कर्नाटक सरकारवर हल्लाबोल

Posted by - December 3, 2022 0
कोल्हापूर : कर्नाटक सरकारने नुकतेच महाराष्ट्राला पत्र पाठवून बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी पाऊल ठेवून नये असा धमकी वजा इशारा दिला आहे.…
Hingoli Accident

Hingoli Accident : दवाखान्यातून परतताना भीषण अपघात; 2 जणांचा जागीच मृत्यू

Posted by - May 4, 2024 0
हिंगोली : हिंगोलीमधून एक भीषण अपघाताची (Hingoli Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये भरधाव कार रस्त्याकडेला असलेल्या झाडाला धडकल्याने भीषण…
Malegaon News

Malegaon News : विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - April 5, 2024 0
मालेगाव : नाशिकमधून (Malegaon News) एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये काही भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *