महत्वाची बातमी ! छत्रपतींनी शिवसेनेची ऑफर नाकारली ? राज्यसभेसाठी अपक्ष लढणार ?

337 0

कोल्हापूर- शिवसेनेच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे यांनी पाठ फिरवली असून संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत अशी सूत्रांची माहिती आहे. आज पहाटेच ते कोल्हापूरकडे रवाना झाल्याचेही समजते आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवण्यात कोणताही रस नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. 

शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळाने ट्रायडंट हॉटेलमध्ये जाऊन संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतली होती. खासदारकी हवी असेल तर संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी शिवसेनेने अट घातली होती. त्याप्रमाणे शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना पक्ष प्रवेशाचे निमंत्रण दिले होते. संभाजीराजे छत्रपती आज दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते.

त्यामुळे संभाजीराजे शिवबंधन बांधणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या निमंत्रण पाठ फिरवली असून ते कोल्हापूरला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संभाजीराजे यांचे मुंबईत असणारे कार्यकर्ते देखील आपापल्या गावी निघून गेले आहेत.

या सर्व घडामोडी पाहता शिवसेना पुरस्कृत म्हणून राज्य सभेची निवडणूक लढविण्यास संभाजीराजे उत्सुक नसून अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. आता शिवसेना सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार जाहीर करणार का ? हे आता पाहावे लागणार आहे.

हा गुंता सोडविण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्यासमोर तिचं पर्याय आहेत. शिवसेनेची ऑफर स्वीकारणे, अपक्ष लढणे किंवा निवडणुकीतून माघार घेणे. यापैकी शिवसेनेची ऑफर संभाजीराजे यांनी नाकारल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. आता उर्वरित दोन पर्यायांपैकी छत्रपती कोणता पर्याय निवडणार याकडे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Share This News

Related Post

पुण्यातील धक्कादायक घटना : पोलिस कर्मचा-याच्या डोक्यात दगड घालून केला जीवघेणा हल्ला, वाचा सविस्तर

Posted by - November 19, 2022 0
पुणे : पुण्यामध्ये गस्त घालीत असताना एका पोलीस कर्मचा-याच्या डोक्यात दगड घालून जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…

Top News Special Report : कुत्ता गोळी ! कमी पैशात नशा देणाऱ्या या गोळीची तरुणांना का लागलीये चटक ?

Posted by - November 15, 2022 0
कुत्ता गोळी ! अत्यंत कमी पैशात नशा मिळवून देणाऱ्या या गोळीनं असंख्य तरुणांना आपल्या व्यसनाच्या विळख्यात ओढलंय. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव…

मनोरंजन क्षेत्रावर शोककळा; अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

Posted by - August 9, 2022 0
मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे तीन दशकांहून अधिक काळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले…

Maharashtra Politics : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठकीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; बैठकीतील विषय…

Posted by - December 9, 2022 0
मुंबई : आज भाजप नेत्या मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये दोन्हीही भाजपच्या बड्या नेत्यांमध्ये…

कार प्रेमींसाठी आनंदाची बातमी : महिंद्राच्या थारला तोडीस तोड मारुतीची JIMNY लॉन्च

Posted by - January 12, 2023 0
कार प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत महिंद्राच्या थारने तिचा जलवा दाखवला आहे. जबरदस्त लुक सह तिच्या ताकतिची सर्वत्र चर्चा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *