शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील डिसेंबर महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूका संभाजी ब्रिगेड पुर्ण ताकतीने लढवणार

304 0

पुणे : शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील डिसेंबर महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीने लढवणार आहे, पेरणे ग्रामपंचायत निवडणूक डिसेंम्बर महिन्यात होणार आहे. वार्ड नंबर ३ आणि वार्ड नंबर ४ ह्या दोन्ही वार्ड मध्ये संभाजी ब्रिगेड उमेदवार देणार आहे, आणि त्यांना विजयी करण्यासाठी पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार आहे अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी माहिती दिली.

पेरणे ग्रामपंचायतच्या वार्ड क्रमांक ३ आणि वार्ड क्रमांक ४ मध्ये कचऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न आहे, संभाजी ब्रिगेडचे उमेदवार निवडून आल्यानंतर दोन्ही वार्डातील प्रश्न संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोडवणार आहोत. आधी विजय स्तंभ समोर असणाऱ्या वाघमारे वस्तीवर राहणाऱ्या लोकांना कचऱ्याचा होणाऱ्या त्रासा पासुन बाहेर काढणार आहोत, ३ आणि ४ मधील वार्डातील जनतेला पिण्यासाठी फिल्टरचे पाणी देणार आहोत.

अनेक प्रश्न आहेत ते संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातुन आम्ही मार्गी लावणार आहोत, असेही घाडगे यांनी संगितले,शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ खेड, जुन्नर, मावळ तालुक्यातीलही ग्रामपंचायत संभाजी ब्रिगेड त्या भागातील तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वात पूर्ण ताकतीने निवडणुका लढवणार आहे, तशा सुचना त्यांना दिलेल्या आहेत. डिसेंम्बर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत पेरणे ग्रामपंचायत वार्ड ३ आणि ४ मधील सर्वच्या सर्व तसेच इतर तालुक्यातील संभाजी ब्रिगेडचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडणून येतील असा विश्वास संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी वेक्त केला आहे.

Share This News

Related Post

चंद्रकांत पाटील यांना हवं ते मंत्रीपद मिळाल नसेल म्हणून त्यांची मानसिक स्थिती बिघडलीय – अजित पवार

Posted by - October 8, 2022 0
पिंपरी चिंचवड : एक वेळ आई वडिलांना शिव्या द्या, चालेल, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना…

१५ दिवसात अनधिकृत बांधकाम पाडा अन्यथा…. ; मुंबई महापालिकेचा राणा दांपत्याला अल्टिमेटम

Posted by - May 21, 2022 0
मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या खार येथील घरातील अनधिकृत बांधकाम पाडा अन्यथा पालिका कारवाई…
Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar : पुणे लोकसभेचा उमेदवार 8 वी पास; सोशल मीडियावर रवींद्र धंगेकरला केले ट्रोल

Posted by - April 1, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जय्यत तयारी सुरू असून बहुतांश पक्षांनी उमेदवारांच्या नावांची यादीही जाहीर केली आहे. सांस्कृतिक…

Cold Blooded Murder :बॅग घेऊन जात असतानाचा आफताबचा तो व्हिडिओ व्हायरल; त्या बॅग मध्ये…. पहा व्हिडिओ

Posted by - November 19, 2022 0
नवी दिल्ली : श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब याने तिचे 36 तुकडे केले. तिच्या शरीराच्या तुकड्यांची विल्हेवाट…

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल; वाचा कसा असेल मार्ग

Posted by - December 27, 2022 0
पुणे : हवेली तालुक्यातील मौजे पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी आयोजित जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्ग क्रमांक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *