संभाजी ब्रिगेड पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने 17 ऑक्टोबर रोजी कार्यकर्ता मेळावा ; आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकणार

567 0

पुणे : संभाजी ब्रिगेड पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वा. पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, पुणे येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आगामी महानगरपालिका, जिल्हापरिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीचे रणशिंग संभाजी ब्रिगेड फुंकणार आहे. तसेच शहर व जिल्ह्यात घर तिथे कार्यकर्ता ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

यावेळी सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, व पत्रकारीकेच्या क्षेत्रात, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. १७ ऑक्टोबर रोजी होणारा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पुणे शहर व जिल्हा पदाधिकारी मेहनत घेत आहेत, संभाजी ब्रिगेड कार्यकर्ता मेळाव्या मध्ये मोठ्या प्रमाणात इतर पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी संभाजी ब्रिगेडमध्ये जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत.

सध्याचे राजकारण आणि संभाजी ब्रिगेडची रणनीती याच्यावर संभाजी ब्रिगेडच्या वतीने एल्गार करण्यात येणार आहे. या संदर्भात संभाजी ब्रिगेड पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने महानगरध्यक्ष अविनाश मोहिते, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, मध्य जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, यांच्या प्रमुख उपस्थितीत, पत्रकार भवन नवी पेठ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव निलेश ढगे, तेजस्विनी पवार, शहर सचिव संदीप कारेकर, उपाध्यक्ष जोतिबा नरवडे, सरचिटणीस सिद्धार्थ कोंढाळकर अनिल बोटे, मावळ लोकसभा कार्याध्यक्ष दिनकर केदारी, जिल्हा कार्याध्यक्ष साजिद सय्यद, डॉ. कुमार गायकवाड, तालुकाध्यक्ष शिवाजी पवार,वाहतुक आघाडी उपाध्यक्ष विजय कदम, सोशल मीडिया प्रमुख अमर गजघाटे सचिन गायकवाड आदित्य खेडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वा. पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड पुणे येथे पुणे शहर व जिल्ह्यातुन हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अविनाश मोहिते, चंद्रशेखर घाडगे, उत्तम कामठे यांनी यावेळी केले.

Share This News

Related Post

राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा करावा; अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्रींची भेट

Posted by - October 19, 2022 0
पुणे : यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे, संपूर्ण खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच सध्या…
eknath shinde

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ निर्णय

Posted by - October 10, 2023 0
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र…

#CRIME : मंत्र तंत्र म्हणून हातावर कापूर जाळायचा आणि पीडित विद्यार्थ्याला ‘तांत्रिक शरीरसंबंध’ करायला भाग पाडायचा; मुंबईतील उच्चशिक्षित दांपत्याचा विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार

Posted by - February 13, 2023 0
मुंबई : मुंबईतील आयआयटीच्या एका विद्यार्थ्यासोबत एक भयानक प्रकार घडला आह. एका समलैंगिक ॲपच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर उच्चशिक्षित दांपत्याने या…
Kirit Somayya

Kirit Somaiya : आधी आरोप, आता प्रचार?; भाजपने किरीट सोमय्यांना तोंडघशी पाडलं

Posted by - May 1, 2024 0
मुंबई : अखेर मुंबईतील सर्व महायुतीचे उमेदवार निश्चित झाले आहेत. तसेच अधिकृतरित्या त्यांची नावं जाहीरही करण्यात आली आहेत. त्यामुळे आता…

पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रम; जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी घेतला नियोजनाचा आढावा

Posted by - December 15, 2022 0
पुणे : हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *