पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रम; जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी घेतला नियोजनाचा आढावा

282 0

पुणे : हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आढावा घेतला आणि विजयस्तंभ परिसरास भेट देऊन पाहणी केली.

यावेळी पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार किरण सुरवसे, गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के, विजयस्तंभ स्मारक समितीचे पदधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी विजयस्तंभ परिसरात नियोजनाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, पीएमपीएमएल, अग्निशमन, सा. बां.विद्युत विभाग आदी विविध विभागांच्या नियोजनाचा आढावा घेतला.

देशभरातील अनुयायी १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांना सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. त्यासाठी प्रत्येक विभागाने समन्वयक अधिकारी नेमावा. येणाऱ्या अनुयायांना कोणतीही समस्या येणार नाही याची दक्षता घ्यावी व नियोजित वेळेत आवश्यक काम पूर्ण करावे असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी वाहनतळ व इतर व्यवस्थेसंबंधी ठिकाणांना भेट देऊन तेथील तयारीचा आढावा घेतला. यावेळी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Share This News

Related Post

Maharashtra Rain

Weather Update : 5 जून ते 14 जूनपर्यंत राज्यात ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Posted by - June 5, 2024 0
मुंबई : राज्यातील वातावरणात सातत्यानं (Weather Update) बदल होताना दिसत आहे. काही ठिकाणी सकाळी ऊन तर रात्री पाऊस अशी परिस्थिती…
Crime

वडगाव मावळ कोर्टातील सरकारी वकिलांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल

Posted by - April 4, 2022 0
आज वडगाव मावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांच्या विरुद्ध एका नवोदित वकिलांना जातीवाचक शिवीगाळ केल्या…
Maharashtra Rain

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; IMD ने वर्तवला अंदाज

Posted by - December 4, 2023 0
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाबाच्या पट्ट्याचं तीव्र दाब क्षेत्रात रूपांतर (Maharashtra Weather) झालं आहे. त्यामुळे त्याचे आता मिचॉन्ग चक्रीवादळात रूपांतर…
Pune News

Pune News : बेकायदेशीर रित्या जमाव जमा केल्याने रवींद्र धंगेकरांपाठोपाठ भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Posted by - May 18, 2024 0
पुणे : पुण्यात (Pune News) 13 मे रोजी मतदान पार पडले. त्याच्याच आदल्या दिवशी म्हणजेच 12 मे रोजी सायंकाळच्या सुमारास…

मुलीला कुत्रा चावला म्हणून महिलेने कुत्र्याच्या दोन पिल्लाना केलं ठार, पुण्यातील घटना

Posted by - April 12, 2022 0
पुणे- मुलीला कुत्रा चावल्याच्या रागातून एका महिलेने कुत्र्याच्या दोन लहान पिल्लांना काठीने बदडून ठार मारलं. एवढंच नाहीतर सोसायटीतील एकाही कुत्र्याला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *