महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशन निवडणुकीत सहकार भारतीचा दणदणीत विजय सहकार भारतीचे 15 उमेदवार विजयी

154 0

मुंबई : दि महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ पैकी १५ जागांवर विजय मिळवत सहकार भारती पुरस्कृत सहकार पॅनलने एकतर्फी दणदणीत विजय मिळवला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत सहकार भारतीने संपादन केलेले हे यश सहकारी बँकींग क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरण्याची प्रतिक्रिया सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी दिली आहे.

फेडरेशनच्या २१ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये सहकार भारती पुरस्कृत सहकार पॅनलचे तब्बल १२ उमेदवार अविरोध निवडून आले. महाराष्ट्रातील सर्व नागरी सहकारी बँकांचे प्रतिनिधीत्व करणारी शिखर संस्था असून महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकेच्या प्रतिनिधींनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. विजयी उमेदवारांमध्ये श्री. अजय ब्रम्हेचा (नाशिक), डॉ शशिताई अहिरे (नाशिक), सौ. वैशालीताई आवाडे (इचलकरंजी), श्री. सत्यनारायण लोहिया (बीड), श्री. राजगोपाल मनियार (सोलापूर), श्री. सुनील देवडा (हिंगोली), श्री. निपुण कोरे (कोल्हापूर) श्री. अनिल देसाई (सातारा), श्री. सतीश गुप्त (चिखली). श्री. शंतनू जोशी (अकोला), श्री. नानासाहेब सोनवणे (नाशिक), श्री. अशोक शेळके (अहमदनगर), श्री. योगेश बन (नागपूर), श्री चंद्रहास गुजराथी (जळगाव), श्री. रत्नाकर कदम (नाशिक) यांचा समावेश आहे.

मुंबई येथील केंद्रीय कार्यालयात सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, राष्ट्रीय संघटनमंत्री श्री. संजयजी पाचपोर, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्री. विवेक जुगादे व इतर पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. संघटनेत कार्यरत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळेच बँक फेडरेशनवर सहकार भारतीने विजय संपादन केला आहे. महाराष्ट्रातील सर्वच नागरी सहकारी बँकांचा सहकार भारतीला भरभरून पाठिंबा असून एक नवीन नेतृत्व देण्यासाठी सहकार भारती सज्ज झाली असल्याचे सहकार भारतीचे महाराष्ट्र महामंत्री विवेक जुगादे यांनी सांगीतले.

Share This News

Related Post

anil Ramod

रामोड कुटुंबीयांच्या खात्यात 47 लाखापेक्षा जास्त रक्कम; CBI तपासात आले समोर

Posted by - June 14, 2023 0
पुणे : पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड (Dr. Anil Ramod) व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने असलेल्या 17 बँक खात्यांमध्ये…

धक्कादायक ! रेल्वे स्टेशनवर पती आणि मुलांसमोर पत्नीवर सामूहिक अत्याचार, आंध्र प्रदेशमधील घटना

Posted by - May 2, 2022 0
हैद्राबाद- आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या एका महिलेवर तिच्या पती आणि मुलासमोर सामूहिक बलात्कार…

महाराष्ट्र राज्य महिला आय़ोगाचा ३० वा वर्धापन दिन : महिला आयोग-फेसबुक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभ

Posted by - January 24, 2023 0
     मा.मुख्यमंत्री व महिला बालविकास मंत्री यांच्या हस्ते महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा गौरव मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा…

BIG NEWS : पुण्यातील पत्रकार भवनमध्ये अर्हम फाउंडेशनच्या ‘वास्तव कट्ट्यामध्ये’ MPSC च्या विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी; वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - December 1, 2022 0
पुणे : गुरुवारी पुण्यातील पत्रकार भवन येथे एमपीएससीच्या MPSC विद्यार्थ्यांच्या समस्या आणि प्रश्न समजून घेणे आणि त्यांची भूमिका मंत्रालयात मांडण्याच्या…

कोरोनाची पुन्हा भीती : “चीन मधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी समिती नेमणार का?” अजित पवारांचा सभागृहात सवाल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले ‘हे’ उत्तर

Posted by - December 21, 2022 0
हिवाळी अधिवेशन नागपूर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. यावेळी चीनमधील कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *