संजय गांधी निराधार योजनेसाठी 625 कोटी, श्रावणबाळसेवा राज्य निवृत्तीवेतनसाठी 1,194 कोटी रुपयांचा निधी

177 0

मुंबई : संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत ६२५ कोटी रुपये तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत १ हजार १९४ कोटी रुपये निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना माहे ऑक्टोबर २०२२ मध्ये वितरीत करण्यात आला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतर्गत किमान १८ ते ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु, पोटगी न मिळालेल्या अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहित स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो.

या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१ हजार पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेखाली पात्र लाभार्थींना रुपये १ हजार दरमहा इतके अर्थसहाय्य दिले जाते. तसेच श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्रय रेषेखालील यादीच्या कुटूंबात नांव असलेल्या व रु.२१,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ६५ व ६५ वर्षावरील पात्र लाभार्थीस दरमहा रु. १,०००/- अर्थसहाय्य देण्यात येते.

माहे सप्टेंबर २०२२ अखेरपर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत रु.५९५ कोटी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत रु. १०५३ कोटी निधी खर्च झालेला आहे. या दोन्हीही योजनांमधून लाभार्थींना दरमहा नियमित अनुदान देता यावे, ही बाब विचारात घेऊन संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत रु.६२५ कोटी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत रु. १ हजार १९४ कोटी निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना माहे ऑक्टोबर २०२२ मध्ये वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

Share This News

Related Post

नवीन गॅस कनेक्शन महागले ! नवीन कनेक्शनसाठी आता ग्राहकांना मोजावे लागणार एवढे पैसे

Posted by - June 15, 2022 0
मुंबई – पेट्रोलियम कंपन्यांनी नवीन घरगुती गॅस कनेक्शनच्या किमती वाढवल्या आहेत. यापूर्वी सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी १४५० रुपये मोजावे लागत होते.…
BJP

पुणे जिल्ह्यात तिन्ही लोकसभा मतदार संघात भाजपची जोरदार तयारी; ‘या’ तिघांवर दिली महत्वाची जबाबदारी

Posted by - June 8, 2023 0
पुणे : भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघांची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात लवकरच लोकसभेची…

पुण्यातील भिडे वाड्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणार; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Posted by - December 21, 2022 0
  पुणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना आठवडाभरात अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश नागपूर : पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले…

अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ, 13 मे पर्यंत कोठडीतच

Posted by - April 29, 2022 0
मुंबई- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुक्काम आणखी काही दिवस कोठडीतच असणार आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने देशमुख यांच्या कोठडीत…
Farmers

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड ! राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - November 8, 2023 0
मुंबई : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *