आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी 25 कोटी देणार-पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

310 0

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकाळी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराला भेट देऊन माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटींचा निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त विकास ढगे-पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, उप विभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, नगर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश जाधव आदी उपस्थित होते.

महसूल मंत्री असताना मंदिर परिसरातील जागेचा प्रश्न सोडविण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य असल्याचे नमूद करून पालकमंत्री पाटील म्हणाले, आळंदी देवस्थानच्या जमिनींवर शासनाकडून गायरान जमिनीचा शेरा दिल्याने जागेच्या विकासावर मर्यादा आल्या. महसूल मंत्री असतांना समितीच्या सदस्यांनी हे निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ वारकरी बांधवांच्या सुविधेसाठी ४०० एकर जमीन देवस्थानला देण्याचा निर्णय घेतला. या जागेच्या विकासासाठी २०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यास पुणे महानगर विकास प्राधिकरणाची मान्यता घेण्यासाठी प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल.

आराखड्यातील कामे करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल. पहिल्या टप्प्यात भक्त निवास, वारकऱ्यांच्या राहुट्या उभारण्यासाठी ओटे आणि आभासी (व्हर्चुअल) वारीसाठी २५ कोटींचा निधी देण्यात येईल. व्हर्चुअल वारीमुळे पंढरपूरला जाऊ न शकलेल्या वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन घेता येईल. संस्थानने त्याचे डिझाईन त्वरीत तयार करावे. नगर परिषदेच्या माध्यमातून ही कामे करण्यात येतील. पुढील टप्प्यात रुग्णालय व इतर कामांचादेखील समावेश करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वारकरी आळंदीत येतात. ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी जगणाऱ्या वारकऱ्यांची भेट होईल म्हणून आपण आळंदीत आल्याचे त्यांनी सांगितले. जनतेची सेवा करण्यासोबत अशा देवस्थान परिसराचे प्रश्न सोडविण्याचे समाधान असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Share This News

Related Post

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाची विक्रमी कमाई

Posted by - March 23, 2022 0
विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घालत असून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित…
Lalit Patil

Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटीलची मासिक कमाई किती? धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - October 20, 2023 0
पुणे : देशातील विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातील ससून रुग्णालयात दोन कोटी रुपयांच्या ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी माफिया ललित पाटील…
Sharad Pawar

Bhiwandi News : भिंवडीत काँग्रेसचे 18 नगरसेवक 6 वर्षांसाठी अपात्र; राष्ट्रवादीला मोठा झटका

Posted by - June 27, 2023 0
भिवंडी : भिवंडी (Bhiwandi News) महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचा आदेश धुडकावून पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध (Bhiwandi News) मतदान करणारे काँग्रेस पक्षाचे 18…

भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना मातृशोक; माधुरी शिरोळे यांचं निधन

Posted by - December 20, 2023 0
पुणे: पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या पत्नी व पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मातोश्री माधुरी उर्फ…
Pimpari Chinchwad Crime

Pimpri-Chinchwad Crime : पिंपरी – चिंचवड हादरलं! पतीच्या ‘त्या’ निर्णयामुळे पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी

Posted by - December 14, 2023 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधून (Pimpri-Chinchwad Crime) पती – पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये वंशाचा दिवा म्हणजे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *