महाराष्ट्राचा सुपुत्र रोमित चव्हाण यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

303 0

सांगली- जिल्ह्यातील शिगाव वाळवा तालुक्यातील शिंगावचा सुपुत्र 23 वर्षीय रोमित तानाजी चव्हाण यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात त्याच्याच गावामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. गावकऱ्यांनी त्यांना साश्रू नयनाने निरोप दिला. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना रोमित चव्हाण यांना वीरमरण आले.

शनिवारी सकाळी चेरामार्ग येथे दहशतवाद्यांना रोखताना झालेल्या गोळीबारात रोमित हे शहीद झाले. या घटनेचे वृत्त शनिवारी दुपारी गावात समजले. रोमित यांचे वडील वीरपिता तानाजी चव्हाण, वीरमाता तसेच रोमित यांच्या बहीण यांच्या सांत्वनासाठी अनेकांनी धाव घेतली. याच दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने वारणाकाठी अंत्यसंस्कारासाठी मैदान तयार केले. विशेष चबुतरा उभारला आहे. सोमवारी सकाळी शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. रोमित यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. रविवारी शिगाव येथे गावकर्‍यांनी उत्स्फूर्तपणे सर्व व्यवहार बंद ठेवत अभिवादन केले.

Share This News

Related Post

गणेश मंडळाना प्रसाद वाटपसाठी करावे लागणार या नियमांचे पालन ; अन्न व औषध प्रशासन विभागाचे निर्देश

Posted by - August 30, 2022 0
पुणे : गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश अन्न व…
Document News

Document News : कामाची बातमी ! ‘या’ एका कागदपत्रावर होणार सर्व कामं, 1 ऑक्टोबरपासून होणार नियम लागू

Posted by - September 14, 2023 0
येत्या एका ऑक्टोबरपासून देशान नवा नियम लागू होणार आहे. आपल्या प्रत्येकासाठी हा नियम समजून घेणं महत्त्वाचं आहे. एक ऑक्टोबरपासून जन्म…

राजस्थान : जोधपूरमध्ये लग्नमंडपात 5 गॅस सिलेंडरचा स्फोट; नावरदेवासह वऱ्हाडी जखमी, 4 जणांचा मृत्यू

Posted by - December 9, 2022 0
राजस्थान : राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक भीषण आगीची घटना घडली आहे. दुर्दैवाने एका लग्न सोहळ्यामध्ये झालेल्या गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटामध्ये चौघा…

रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश कार्यकारीणीची 3 सप्टेंबरला निवडणूक ; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले राहणार उपस्थित

Posted by - September 2, 2022 0
मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) या पक्षाची मुंबई प्रदेश अध्यक्ष आणि कार्यकारीणीची निवडणूक येत्या दि. 3…

SPECIAL STORY : उदय लळीत भारताचे नवे सरन्यायाधीश : जाणून घेऊयात उदय लळीत यांच्याविषयी…

Posted by - August 27, 2022 0
भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून उदय उमेश लळीत यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *