पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा

252 0

पुणे : जिल्हा परिषदेने सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेऊन विश्वस्ताच्या भूमिकेतून विकासाभिमुख कामे करावीत अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

पुणे जिल्हा परिषदेची आढावा बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार राहूल कूल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश अवताडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सचिन घाडगे, जामसिंग गिरासे, मिलिंद टोणपे यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा प्रत्येक महिन्यात घेण्यात यावा, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, केंद्राच्या योजनांचा मोठ्या प्रमाणात निधी येत असतो. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव गतीने तयार करणे, मंजुरीसाठी पाठवणे तसेच त्यांचा केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करावी. केंद्र तसेच राज्याच्या अधिकाधिक योजना राबवण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न करावेत, अशाही सूचना श्री. पाटील यांनी केल्या.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हा परिषदेतील विविध विभागांद्वारे राबवण्यात येत असलेल्या योजना व कामांची सविस्तर माहिती घेतली. अंगणवाडी बांधकाम, रस्ते, शाळा सुधार योजना, प्राथमिक आरोग्य केंद्रे आदींसाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल असे सांगतानाच जनतेच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी प्राधान्याने निधीची तरतूद ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

विकास योजना निरीक्षण कक्षाचे उद्घाटन
तत्पूर्वी जिल्हा परिषदेत उभारलेल्या विकास योजना निरीक्षण कक्षाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या कक्षामार्फत जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विकास योजनांच्या आर्थिक, भौतिक प्रगतीचा आढावा घेण्यासह संगणकीय पद्धतीने सनियंत्रण केले जाणार आहे. त्यामुळे ही कामे गतीने मार्गी लावण्यासाठी या कक्षाचा उपयोग होईल असे मंत्री पाटील यावेळी म्हणाले.

यावेळी श्री. प्रसाद यांनी विविध विभागांच्या कामाचा तसेच आर्थिक बाबींचा आढावा सादर केला. फिरते पशुवैद्यकीय दवाखाने, जलशक्ती मिशनअंतर्गत लघु पाटबंधारे तलावांचे गाळ काढण्याचे काम, अंगणवाडी सुधार, ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम, कृषी विभागाच्या योजना, यशवंत घरकुल योजना आदींविषयी सादरीकरण केले. पशुंमधील लंपी आजारावर नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेने गतीने लसीकरण केल्याचे त्यांनी सांगितले.

पदोन्नती मिळालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात पदोन्नती आदेश मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच लम्पी स्कीन आजारामुळे पशू दगावलेल्या पशुपालकांना मदतीचे धनादेशही वितरीत करण्यात आले.

Share This News

Related Post

Pune PMC Water Supply News

Pune Water : पुण्यातील पाणीकपातीसंदर्भात घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - February 24, 2024 0
पुणे : पुणेकरांसाठी (Pune Water) एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आज उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी…
Shantigiti Maharaj

Shantigiri Maharaj : नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल

Posted by - May 20, 2024 0
नाशिक : EVM मशीन ला हार घालणे शांतिगिरी महाराजांना (Shantigiri Maharaj) चांगलंच महागात पडल आहे. नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल…

‘… तर औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्याचे दात तोडून दाखवा’, नवनीत राणाचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Posted by - May 14, 2022 0
नवी दिल्ली- आजच्या शिवसेनेच्या सभेचा टिझर पाहिला. त्यात उद्धव ठाकरे म्हणतात ‘तुम्ही मला वज्रमूठ द्या, दात पाडण्याचं काम मी करतो’.…

98 वर्षीय कैद्याची तुरुंगातून सुटका; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले, “नेमका काय गुन्हा केला होता ?”

Posted by - January 9, 2023 0
अयोध्या : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. यामध्ये एका वयोवृद्ध व्यक्तीला कारागृहातून मुक्त करण्यात येते आहे, असे…

शारदा सहकारी बँक ‘कॉसमॉस’ बँकेत विलीन करण्यास रिझर्व बँक ऑफ इंडियाची मंजुरी

Posted by - October 30, 2022 0
पुणे: आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या श्री शारदा सहकारी बँकेचे कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेत विलीनीकरण, एकत्रीकरणाच्या प्रस्तावाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शनिवारी (दि.29)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *