विद्यापीठ अधिसभेचा आज निकाल : मतमोजणीचे विद्यापीठाकडून सूक्ष्म नियोजन; खाशाबा जाधव क्रीडासंकुलात सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मतमोजणी

251 0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीसाठी झालेल्या मतदानाची दिनांक २२ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून यासाठी सर्व तयारी विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मतदारांची संख्या दुप्पट असल्याने यंदा निकालाला अधिक वेळ लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या दहा जागा पदवीधरांमधून निवडून देण्यासाठी विद्यापीठाकडून रविवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. याची मतमोजणी २२ नोव्हेंबर सकाळी आठ वाजल्यापासून विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडासंकुल येथे होणार आहे.

याबाबत माहिती देताना विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.प्रफुल्ल पवार म्हणाले, सर्व मतमोजणी ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीत होणार आहे. यासाठी साधारण १७ हजार चौरसफूट अशा भव्य क्रीडा संकुलात ७२ काउंटर तयार करण्यात आले आहे. विद्यापीठातील जवळपास ३०० प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. मतमोजणीचे आकडे दर काही वेळाने मोठ्या पडद्यावर जाहीर करण्यात येतील.

मागील वेळी निकाल जाहीर होण्यासाठी पहाटेचे सहा वाजले होते या सर्व बाबी गृहीत धरून यंदा महिला आणि ज्येष्ठ कर्मचारी यांचा विचार करून व जास्तीत जास्त युवा कर्मचारी अधिकारी यात सहभागी केले आहेत.

Share This News

Related Post

Loksabha Election

Pune Loksabha : मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास निश्चित केलेले १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य; यादी केली जाहीर

Posted by - May 12, 2024 0
पुणे : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळख जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले…

राज्यात सुरु असलेल्या भारनियमनाविरोधात पुण्यात मनसेचं आंदोलन

Posted by - April 25, 2022 0
वीजप्रश्नावरून पुण्यात मनसे  आक्रमक झाली आहे. आज मनसेने महावितरणच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. भारनियमन आणि सिक्युरिटी डिपॉझिटचा मनसेने यावेळी विरोध केला.…

राज्यपालांनी 6 आमदारांच्या नावांची शिफारस केल्याचं ‘ते’ पत्र बनावट

Posted by - April 19, 2022 0
मुंबई – राज्यपालांनी 6 आमदारांची नावे सुचवलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे एकच खबळबळ उडाली. हे पत्र बनावट असल्याचा…

अजितदादांना भाषण नाकारणे हा महाराष्ट्राचा अपमान, सुप्रिया सुळे संतापल्या

Posted by - June 14, 2022 0
पुणे- देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंदर मोदी यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री…

महाराष्ट्राचा ५६ वा वार्षिक निरंकारी संत समागम औरंगाबादमध्ये होणार संपन्न; पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातून हजारो भाविक राहणार उपस्थित

Posted by - January 23, 2023 0
पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या तारखा जसजशा जवळ येत चालल्या आहेत तसतसे निरंकारी भक्तगणांकडून समागमाच्या पूर्वतयारीला वेग…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *