शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट, वाचा सविस्तर माहिती

631 0

दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रती १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ४८६ कोटी ९४ लाख खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

सदरहू शिधावस्तूंचा संच दिवाळी पूर्वी वाटप व्हावा त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

Share This News

Related Post

दोन वर्षानंतर मुख्यमंत्र्यांचे मंत्रालयात आगमन, कामकाजाचा घेतला आढावा

Posted by - April 13, 2022 0
मुंबई- कोरोनानंतर जवळपास दोन वर्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला. तसेच प्रशासनाचे काम…

‘The Invisibles with Arbaaz Khan’ : सलमान खानच्या आईला पाहून हेलन लपून बसायची ; अभिनेत्री हेलनने सांगितले त्या काळातले किस्से !

Posted by - February 20, 2023 0
‘The Invisibles with Arbaaz Khan’ : भाऊ अरबाज खान सध्या ‘द इनविंसिबल्स विथ अरबाज खान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शोच्या…

Vice Presidential Election : 6 ऑगस्टला होणार उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक

Posted by - July 21, 2022 0
नवी दिल्ली : २१ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक पार पडते आहे. दरम्यान उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणूक प्रक्रिया ६ ऑगस्ट २०२२…

जम्मू-काश्मिरातील तोतया अधिकाऱ्याचे पुणे कनेक्शन; झेड प्लस सुरक्षा; बुलेट प्रूफ एसयूव्हीत फिरणाऱ्या या अधिकाऱ्याने पुण्यातील ‘या’ विद्यापीठाला ठगले ?

Posted by - March 21, 2023 0
पुणे : तो अधिकारी पंतप्रधान कार्यालयात वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगायचा ,या ठगाला झेड प्लस सुरक्षा, बुलेटप्रूफ एसयूव्ही गाडी आणि राहण्यासाठी…

‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक श्री स्वानंदेश रथातून संपन्न ; जगभरातून हजारो गणेशभक्तांनी घरबसल्या घेतला सांगता मिरवणुकीचा आनंद

Posted by - September 10, 2022 0
पुणे : मोरया, मोरया… गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… च्या निनादाने लक्ष्मी रस्त्याचा परिसर दुमदुमून गेला. अनंत चतुर्दशीला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *