पीयूसी केंद्रांचे नूतनीकरण ठप्प ! पीयूसी केंद्रचालकांनाच माराव्या लागत आहेत आरटीओत फेऱ्या !

522 0

शहरातील प्रदूषण चाचणी केंद्राचा म्हणजे पीयूसी परवाना नूतनीकरणास तांत्रिक अडचणी येत असल्यानं ‘पीयूसी’ केंद्र चालकांना ‘आरटीओ’त फेऱ्या माराव्या लागत आहेत. परवाना मिळत नसल्यानं ‘पीयूसी’ केंद्र बंद राहत असून नागरिकांना पीयूसी काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दुचाकी, चारचाकी आणि सार्वजनिक सेवा देणाऱ्या सर्व वाहनांना ‘पीयूसी’ बंधनकारक आहे. प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता टिकून राहावी म्हणून केंद्र सरकारने ‘पीयूसी’ प्रमाणपत्र बंधनकारक केलं आहे.
मात्र बरेच वाहनचालक याकडे दुर्लक्ष करतात. मोटार वाहन कायद्यानुसार ‘पीयूसी’ नसेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते.

पुणे शहरात एकूण 404 पीयूसी केंद्र आहेत. यापैकी सध्या 285 पीयूसी केंद्र सुरू आहेत तर इतर केंद्र विविध कारणांनी बंद आहेत. परवाना नूतनीकरण होत नसल्यान पीयूसी केंद्र चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रशासनाकडून संगणक यंत्रणेत तांत्रिक बदल होत असल्यानं ही सुविधा बंद असल्याचं कारण दिल जात आहे.

Share This News

Related Post

छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो…. संभाजीराजेंचं ट्विट

Posted by - May 29, 2022 0
कोल्हापूर- राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात सध्या चांगलीच हवा तापली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरुवातीला निवडणुकीत अपक्ष…

पुन्हा धाकधूक वाढली…!शिवसेनेच्या १९ लोकसभा खासदारांपैकी ७ खासदार बैठकीला अनुपस्थित…

Posted by - July 11, 2022 0
मुंबई : शिवसेनेच्या एकूण १९ लोकसभा खासदारांपैकी १२ खासदार मातोश्रीमध्ये बैठकीला उपस्थित आहेत. परंतु ७ खासदार अनुपस्थित असल्याने शिवसेनेच्या गोटात…

पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह विजेत्यांचा पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या हस्ते गौरव

Posted by - March 27, 2023 0
पुणे : पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह सन-२०२० व विशेष सेवा पदक सन-२०२० विजेत्यांना पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *